Virar Suicide Case: विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे परिसरात खळबळ उडाली आहे. येथे दोन तरुणांनी इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवल्याची बातमी समोर आली आहे. प्रकरणातील मृत तरुण हे पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होते. श्याम सनद घोरई (20) आणि आदित्य रामसिंग (21) अशी पीडित तरुणांची नावे समोर आली आहेत.
ADVERTISEMENT
18 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
सोमवारी (6 ऑक्टोबर) रोजी रात्रीच्या वेळेत विरारच्या बोळींज येथील सुपर होम नावाच्या इमारतीमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. या इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी आत्महत्या केली. संबंधित तरुण हे नालासोपारा येथील राहूल इंटरनॅशनल महाविद्यालात कॉमर्स शाखेत पदवीच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होते.
हे ही वाचा: MBBS च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं! हुशार तरुणीसोबत काय घडलं? सोलापुरातील धक्कादायक घटना
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत गेले अन्..
मिळालेल्या माहितीनुसार, आगाशी-अर्नाळा मार्गावर विरार पश्चिमेकडे ओलांडा परिसरात एका इमारतीचं बांधकाम सुरू असून या इमारतीच्या खाली दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. नालासोपारा येथे राहणाऱ्या श्याम घोरई आणि आदित्य रामसिंग हे दोन तरुण दुचाकीवरून ओलांडा परिसरात आले होते. त्या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा: 'काही नेते विशिष्ट जातीबाबत..', अजितदादांनी भुजबळांसमोर व्यक्त केली नाराजी, जीआरबाबत पक्षाची भूमिकाच सांगितली
पोलीस अधिकाऱ्यांनी केला तपास
दोन विद्यार्थ्यांनी इमारतीवरून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यातील अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी दोन तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळाचा तपास करताना पोलिसांना तिथून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, त्यामुळे या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. स्थानिक पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. आता पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून यामागचं नेमकं कारण शोधण्याच्या प्रयत्नात आहे.
ADVERTISEMENT
