'काही नेते विशिष्ट जातीबाबत..', अजितदादांनी भुजबळांसमोर व्यक्त केली नाराजी, जीआरबाबत पक्षाची भूमिकाच सांगितली
Ajit Pawar on Chhagan Bhujbal : काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, अजितदादांनी छगन भुजबळांसमोर नाराजी बोलून दाखवली
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात

अजितदादांनी छगन भुजबळांसमोर नाराजी बोलून दाखवली
Ajit Pawar on Chhagan Bhujbal, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि पक्षनेते अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासमोर थेट नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणाशी संबंधित सरकारी निर्णय (जीआर) आणि त्यावर भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, याबाबत अजित पवारांनी पक्षाच्या बैठकीत भूमिका मांडली आहे.
काही नेते विशिष्ट जातीबाबत टोकाची भूमिका घेतात - अजित पवार
बैठकीदरम्यान अजित पवार म्हणाले की, "काही नेते विशिष्ट जातीबाबत टोकाची भूमिका घेतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा खराब होते आणि त्याची राजकीय किंमत पक्षाला मोजावी लागते." त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित नेत्यांमध्ये काही क्षण शांतता पसरली. अजित पवार यांनी भुजबळांचं नाव घेतलं नसले तरी त्यांच्या वक्तव्याचा रोख स्पष्टपणे भुजबळांकडे असल्याचं सर्वांनाच जाणवलं.
हेही वाचा : IPS अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसह परदेश दौऱ्यावर असतानाच स्वत:वर गोळ्या झाडल्या
दरम्यान, या बैठकीतून अजित पवारांच्या नाराजीमुळे एनसीपीमध्ये अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय निर्माण झाला असून, मराठा आरक्षणासंदर्भातील चर्चेला नवं वळण मिळालं आहे. अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्यासमोर नाराजी व्यक्त करत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.