IPS अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसह परदेश दौऱ्यावर असतानाच स्वत:वर गोळ्या झाडल्या

मुंबई तक

IPS Y. Puran Kumar Suicide Case : IPS अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसह परदेश दौऱ्यावर असतानाच स्वत:वर गोळ्या झाडल्या

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

IPS अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं

point

IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसह परदेश दौऱ्यावर असतानाच स्वत:वर गोळ्या झाडल्या

IPS Y. Puran Kumar Suicide Case : हरियाणातील कर्तव्यनिष्ठ, परंतु सतत वादाच्या भोवऱ्यात असलेले पोलिस अधिकारी आयपीएस वाय. पूरन कुमार यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. 2001 च्या बॅचचे हे आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार  कधीच सत्तेसमोर झुकले नाहीत. ते भ्रष्टाचार, प्रशासनातील विसंगती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारांविरोधात नेहमीच आवाज उठवताना पाहायला मिळायचे. मात्र, 7 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांनी चंदीगडमधील त्यांच्या सरकारी निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

कोण होते वाय. पूरन कुमार?

वाय. पूरन कुमार हे हरियाणा कॅडरमधील 2001 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. कठोर, निडर आणि प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आयजीपी (रोहतक रेंज), आयजीपी (कायदा आणि सुव्यवस्था), आयजी (दूरसंचार) तसेच शेवटचे पद – आयजी, पोलिस प्रशिक्षण केंद्र (PTC) सुनारिया, रोहतक अशी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. 2025 च्या मध्यात सरकारने त्यांचा बदली आदेश काढत त्यांना रोहतक रेंजवरून सुनारिया येथे हलवले होते. हाच त्यांचा अखेरचा कार्यकाळ ठरला.

चंदीगडमधील सेक्टर 11 येथील त्यांच्या सरकारी निवासातून 7 ऑक्टोबरच्या सकाळी गोळीबाराचा आवाज आला. पोलिसांनी आत प्रवेश केल्यावर वाय. पूरन कुमार रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली होती. घटना घडली त्यावेळी त्यांची पत्नी आयएएस अधिकारी अमनीत कौर या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासोबत जपान दौर्‍यावर होत्या. घटनेनंतर चंदीगडचे आयजी व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू करण्यात आला. सध्या चंदीगड पोलिसच या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पूरन कुमार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये दीर्घकाळ तणावाचे वातावरण होते. अनेकदा त्यांनी स्वतःला “सिस्टिमचा बळी” असे म्हटले होते.

वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द

पूरन कुमार हे प्रशासनातील भेदभाव, मनमानी आणि बेकायदेशीर आदेशांविरोधात खुलेपणाने बोलणारे अधिकारी म्हणून ओळखले जात होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp