पुणे हादरलं! दोघेही एकत्र दारू प्यायले, नंतर वाद झाला, गर्लफ्रेंडची सटकली आणि बॉयफ्रेंडलाच...
Pune Crime : ग्रामीण पुण्यातील चाकण एमआयडीसीत एका प्रेयसीने आपल्याच प्रियकराची हत्या केली, या हत्येमागचं कारण समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

चाकण एमआयडीसीत गर्लफ्रेंडकडून बॉयफ्रेंडची हत्या

48 तासांतच प्रकरण आलं समोर

एकूण प्रकरण काय?
Pune Crime : ग्रामीण पुण्यातील चाकण एमआयडीसीत एका प्रेयसीने आपल्याच प्रियकराची हत्या केली. बॉयफ्रेंड नेहमी मला त्रास देतो आणि भांडण करतो या कारणाने प्रेयसीनं बॉयफ्रेंडला संपवलं. तिने आपला भाऊ आणि होणाऱ्या भाऊजयीला हाताशी धरलं आणि बॉयफ्रेंडला संपवलं. या घटनेनं एमआयडीसी चाकण हा परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी लक्ष घातल तिघांनाही 48 तासांमध्ये छत्रपती संभाजीनगरातून अटक केली.
हे ही वाचा : अल्पभूधारक शेतकऱ्याच्या लेकींनी नाव काढलं! MBBS चं शिक्षण घेण्यासाठी पात्र ठरल्या, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
गेली तीन वर्षे प्रेमसंबंध आणि हत्या
अटकेत असलेल्यांची नावे आता समोर आली आहेत. मुकेश कुमार (वय 24), आरतीकुमारी बिजलाऊराम उराव (वय 23), आकाश बिजलाऊराम उराव (वय 21) आणि बालमुनी कुमारी रामचंद्र उराव (वय 21) हे तिघेही झारखंड राज्यातील रहिवासी आहेत. यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरतीचे आणि मुकेशचे एकमेकांसोबत गेली तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. एका महिन्यापूर्वी ते चाकण एमआयडीसीतील कडाचीवाडी येथे एका भाडेतत्त्वावरील खोलीत राहत होते. मुकेश हा आरतीकुमारला सतत मारहाण करायचा.
बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून हत्या
तिने बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून आपला भाऊ आकाश आणि त्याची होणारी बायको बालमुनी कुमारी यांना बोलावले. 2 ऑक्टोबर रोजी रात्री आरतीकुमार आणि मुकेशकुमार हे एकत्र दारू प्यायल्यानंतर पु्न्हा वाद उफळू लागला. यातूनच तिघांनी मिळून रात्री मुकेशला बेदम मारहाण केली. त्यानंतर मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून निर्जनस्थळी फेकून दिला. त्याच ठिकाणी मृतदेहावर दगड विटा भिरकावण्यात आल्या होत्या. त्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पळून गेले.