अल्पभूधारक शेतकऱ्याच्या लेकींनी नाव काढलं! MBBS चं शिक्षण घेण्यासाठी पात्र ठरल्या, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
Nanded News : कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर साक्षी आणि दिव्या या दोन शेतकरी मुलींना कष्टाचं फळ मिळालं आहे, त्यांना एमबीबीएस शिक्षणासाठी त्या पात्र ठरल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शेतकरी बापानं कष्ट केलं

बापाच्या कष्टाचं चीज लेकींनी केलं
Nanded News : शेतकरी माय-बाप हा केवळ स्वत:च्याच पोटापाण्यासाठी शेती करतो असे नाही. तो या जगाचा पोशिंदा आहे तो जगासाठी देखील काम करत असतो. पण, याच शेतकऱ्यावर आपल्या कुटुंबाचा भार असतो. अनेकदा आपली मुलं शिक्षण घेऊन मोठी व्हावीत असे अनेकदा त्याला वाटते. आता त्याच शेतकऱ्याच्या दोन मुली एमबीबीएससाठी पात्र ठरल्या आहेत. ही घटना नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील किन्हाळा येथील आहे. जिद्दीच्या जोरावर साक्षी आणि दिव्या यांनी कष्टाचं फळ मिळवलं आहे.
हे ही वाचा : तरुणीचा चेहरा विद्रुप होईपर्यंत चाकूने सपासप वार, घटनेनं परिसर हादरून गेला, ओळखीच्याच व्यक्तीने 'त्या' रात्री काढला काटा
शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज
नांदेड जिल्ह्यातील किन्हाळा गावातील असलेले अल्पभूधारक शेतकरी हणमंत भोसले या शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज झालं आहे. हणमंत यांनी शेतीत काबाडकष्ट करून शहरातील एका दुकानावर काम करुन मुलींना शिक्षण दिलं.सुरुवातीला नातेवाईकांनी, तसेच गावातील लोकांनी टोमणे मारले. मुलींना शिक्षण देण्याची गरजच काय? असे निरर्थक प्रश्न केले. वंशाचा दिवा म्हणत हणमंत यांनी दोन्ही लेकींना शिक्षण देण्याचा निर्धार केला.
परिस्थिती बिकट असूनही हणमंत यांनी दोन्ही मुलींना शिक्षण दिलं. त्यानंतर मुलींनी देखील आपल्या आई वडिलांचे नाव काढले. मुलींनी जाणीव ठेवत आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे. लेकींनीही अभ्यास सांभाळत शेतात जाऊन आई वडिलांना अनेकदा मदतीही करायचे. अभ्यास आणि काम अशी दोन्ही कसरत करत यश संपादन केलं.
हे ही वाचा : रासायनिक टँकरची सिलिंडरने भरलेल्या वाहनाला धडक, 200 सिलिंडरचा मोठा स्फोट, पाच वाहने जळून खाक आणि...
वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र
दरम्यान, मागील वर्षी झालेल्या नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नीट परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आणि पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरल्या. त्यांच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होताना दिसते. इच्छाशक्ती असले तर कोणत्याही परिस्थितीत स्वप्न पाहूण ते सत्यात उतरवणं अशक्य नसते हे त्यांनी करून दाखवलं.