MHA Recruitment 2025: मंत्रालयात सरकारी नोकरी मिळवण्याचं बऱ्याच तरुणांचं स्वप्न असतं. तरुणांना गृह मंत्रालयात (Ministry of Home Affairs) सरकारी नोकरी मिळवण्यासाठी नवी संधी उपलब्ध झाली आहे. गृह मंत्रालयाने 'डायरेक्टर'च्या पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार MHA च्या mha.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
'इतक्या' रिक्त जागा
गृह मंत्रालयाच्या या भरतीच्या माध्यमातून एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार 19 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करु शकतात. या भरतीच्या पात्रतेविषयी सविस्तर जाणून घ्या.
हे ही वाचा: गाडीवर भारत सरकारचा बोर्ड, IAS असल्याचं ओळखपत्र दाखवून सगळ्यांना गंडवलं, पोलिसांनी कसं पकडलं?
वयोमर्यादा आणि पात्रता
गृह मंत्रालयात या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. यासाठी उमेदवारांना निर्धारित स्वरुपात अर्ज भरून तो आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पत्त्यावर पाठवणं अनिवार्य आहे.
हे ही वाचा: आई-वडील गेले, भावानेही स्वत:ला संपवलं म्हणून मानसिक धक्का, अनूपने 3 वर्ष स्वत:ला एकाच फ्लॅटमध्ये...
वेतन
गृह मंत्रालयाच्या या पदांवर नियुक्ती झाल्यानंतर उमेदवारांना मॅट्रिक्स लेवल-13 नुसार वेतन दिलं जाईल. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 1,23,100 रुपये ते 2,15,900 रुपये मासिक वेतन दिलं जाईल.
अर्जाचे डिटेल्ड स्वरूप आणि इतर मार्गदर्शक तत्त्वांसाठी अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर नोटिफिकेशन तपासू शकतात.
ADVERTISEMENT
