MP News: मध्य प्रदेशातील ग्वालियरमधून एक चकित करणारी बातमी समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या बायकोकडून धोका मिळाल्यामुळे दु:खी होऊन विष प्यायल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करावं लागलं. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. यावर पतीने "माझी पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. माझ्याच सासऱ्याने तिला 10 लाखांना विकलं." असा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
ग्वालियरमधील भितरवार परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. वॉर्ड नंबर-1 मधील बंजार परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने विष प्यायलं. विष पिणाऱ्या तरुणाचं म्हणणं आहे की, "माझ्या पत्नीच्या वागण्यामुळे मी विष प्यायलं. माझ्या सासऱ्याने तिचा सौदा करत तिला 10 लाख रुपयांना विकले. माझ्याशी लग्न झालेलं असून सुद्धा माझी बायको तिच्या प्रियकरासोबत पळून गेली."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनू बंजारा नामक तरुणाची पत्नी 19 जून रोजी धर्मवीर बंजारा नावाच्या व्यक्तीसोबत पळून गेली. या घटनेतील पीडित तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधीची तक्रार केली. धर्मवीर बंजारा आणि त्याच्या दाजीसह आणखी काही लोकांनी मिळून आपल्या पत्नीला घेऊन गेल्याचं तरुणाने तक्रार करताना सांगितलं.
हे ही वाचा: लग्नाआधीच राहिली गरोदर; रागात वडिलांनी मर्यादाच सोडल्या, जंगलात जाऊन मुलीसोबत...
दागिने आणि पैसे घेऊन पळून गेली
तसेच, पळून जाताना सोबत मंगळसूत्र, झुमके, अंगठी, बांगड्या, कंबरपट्टा आणि पैंजण असे जवळपास 2 लाखांचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख रक्कम घेऊन गेल्याचा आरोप आहे. याच कारणामुळे दु:खी होऊन मोनूने विष प्यायलं आणि त्याची तब्येत बिघडल्यानंतर त्याला भितरवार रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आलं. प्राथमिक उपचारांनंतर त्याला ग्वालियरमध्ये रेफर करण्यात आलं.
हे ही वाचा: पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत पतीला समजलं! नवऱ्याच्या डोळ्यात फेकली मिरची पावडर, दोघांनी नंतर बेडवरच...
पतीसोबत राहायचं नाही...
ग्वालियरमध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या मोनूने आपला सासरा छत्रपास बंजारावर त्याच्या पत्नीला पळून जाण्यास मदत केल्याचे आरोप केले आहेत. सासऱ्याने आपल्या मुलीला 10 लाख रुपयांना विकलं असल्याचं मोनूने आरोप केले. मोनूच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या एक ते दोन वर्षांच्या मुलाला सोडून त्याची पत्नी पळून गेली. पोलीस मोबाईल लोकेशनच्या आधारे मोनूच्या पत्नीचा शोध घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यावेळी मोनूच्या पत्नीने सोमवारी परत भितरवारला येणार असल्याचं सांगितलं. मात्र पतीसोबत राहायची इच्छा नसल्याचं तिचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
