Maharashtra Weather : हवामान विभागाने सोमवार 30 जून रोजी मान्सूनच्या अंदाजाबाबतची महत्त्वाची अपडेट जारी केली आहे. हवामान विभागाने मान्सूनचा प्रभाव राज्याच्या काही भागात दिसून येणार असल्याचा अंदाज वर्तवला. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आणि इतर हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार हवामानाची शक्यता वर्तवलेली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मराठी कामगारांना कामावरून काढून टाकण्याची कंत्राटदाराची धमकी
कोकण
कोकण आणि घाटमाथ्यावर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 30 जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत पावसाच्या संततधारा आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित राहिल.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि साताऱ्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये मध्यम स्वरुपाच्या पवासाचा अंदाज वर्तवला आहे. नाशिक आणि अहमदनगरमध्ये काही ठिकाणी पाऊस असेल. घाटमाथ्यावर प्रवास करताना सावधगिरी बाळगावी असा हवामान खात्याने सावधागिरी बाळगण्याबाबतचा सलाला दिला.
विदर्भ
विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तर इतर काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केली केला आहे. शेतकऱ्यांनी पेरणी आणि पिकांच्या नुकसानीबाबत सतर्क राहावे.
हेही वाचा : पन्नास लाख रुपये देऊन सासरच्यांनी सूनेचा छळ केला, हत्येमागचं धक्कादायक कारण आलं समोर
मराठवाडा
मराठवाडा तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस थैमान घालेल. हवामान विभागाने पाण्याचा योग्य वापर आणि पिकांच्या संरक्षण करावे, असा हवामान विभागाने सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT
