पन्नास लाख रुपये देऊन सासरच्यांनी सूनेचा छळ केला, हत्येमागचं धक्कादायक कारण आलं समोर

मुंबई तक

Pune Crime News : पीडित सूनेचा सासरच्यांकडून छळ करण्यात आला होता. त्यानंतर तिचा खून करण्यात आलेला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी पतीसह सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ADVERTISEMENT

Pune Crime News
Pune Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील वडगाव शेरीत धक्कादायक प्रकार

point

सूनेचा सासरच्यांकडून छळ

Pune Crime News : पुण्यातील वडगाव शेरीतील सिलिकॉन बे सोसायटीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सासरच्या मंडळींनी सूनेकडून तब्बल 50 लाखांची मागणी केली. 50 लाख रुपये दिल्यानंतरही पीडित सूनेच्या सासरच्यांकडून छळ करत तिचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी पतीसह सहा जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात 24 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

हेही वाचा : धक्कादायक! रस्त्याच्या कडेला बास्केटमध्ये दोन दिवसांचं नवजात अर्भक, चिठ्ठीत लिहिलं मला माफ करा...नेमकं काय घडलं?

अशातच आता आरोपींची नावे समोर आलेली आहे. पती प्रणील निकुडे (वय 24), सासरे उदय निकुडे (वय 60), सासू वैशाली निकुडे (वय 55) तर दीर प्रतीक निकुडे (वय 30), यामध्ये चुलत सासरे माणिक निकुडे आणि त्यांचा मुलगा प्रमोद निकुडे अशी आरोपींची नावे आहेत, हे सर्व सध्या फरारी असल्याची माहिती समोर येत आहे. 

तरुणीच्या विवाहात 25 लाखांचा केला होता खर्चा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या 2023 मध्ये तिचा थाटामाटात विवाह झाला होता. वडिलांनी 25 लाख रुपये देऊन रोख रक्कम, दागिने आणि गृहपयोगी वस्तू दिल्या. मात्र, विवाह झाल्यानंतर काही महिन्यातच तिचा छळ सुरू झाला होता. अशावेळी वडिलांनी नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन सासरच्या मंडळींना वेळोवेळी 50 लाखांची आर्थिक मदत केली, तरीही तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरुच राहिला. 

दरम्यान, 27 मे रोजी पतीनेच तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 25 जून रोजी रात्री साडेआकरा वाजता, मोमोजची ऑर्डर दिली आणि किरकोळ वाद झाला होता. आरोपी पतीने तिचे डोकं कपाटावर आपटले, तिचे केस उपटले आणि तिचा मोबाईल फोन फोडला. जबरदस्तीने गॅलरीकडे नेलं आणि ढकलून देण्याचा प्रयत्न केला. 

हेही वाचा : शिंदे गटाच्या नगरसेवकाने महिलेवर विनयभंग केल्याचा आरोप, थेट भररस्त्यात तुडवलं

विवाहितेचा आरडा ओरड ऐकून सोसायटीच्या वॉचमनने तिच्या वडिलांना फोन करून बोलावलं. ते मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पीडितेला घेऊन गेले. या प्रकरणाचा तपास करत वरिष्ठ निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली आहेत. सोसायटीतील वॉचमन व रहिवाशांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp