दिरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कुटुंबाचा दबाव, शेवटी महिलेनं काय केलं?

रामगढमधील एका विवाहितेचा दिरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दिरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव

point

कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल

Crime News : झारखंडमधील रामगढ जिल्ह्यातून एका विवाहितेने सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केल्याची घटना समोर आली आहे. रामगढ येथील बालेश्वर महतो यांच्याशी 27 नोव्हेंबर 2022 रोजी तिचा विवाह झाला होता. विवाहाच्या चार वर्षानंतरही अपत्य न झाल्याने सासरच्या मंडळींनी तिच्यावर लहान दिराशी अनैतिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. विवाहितेने या अयोग्य मागणीला स्पष्ट नकार दिल्याने तिचा छळ वाढवण्यात आला.

दिराशी संबंध न ठेवल्यास...

या विरोधानंतर सासरच्या लोकांनी तिच्यावर हुंड्यासाठी देखील दबाव टाकला. विवाहितेकडे दोन लाख रुपये रोख आणि एक वॉशिंग मशीनची मागणी करण्यात आली. तिने माहेरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगितल्यानंतरही सासरच्यांनी तिच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर दिराशी संबंध न ठेवल्यास जीवे मारण्याची धमकी देत सुमारे 15 दिवसांपूर्वी तिला बेदम मारहाणही करण्यात आली.

हे ही वाचा : राजकीय मतभेद बाजूला! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ, ब्रीच कँडी रुग्णालयात काय घडलं?

पीडितेचा जबाब

या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने रामगढ महिला पोलीस ठाण्यात जाऊन पतीसह सासरच्या इतर सदस्यांविरोधात तक्रार नोंदवली आहे. महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी रेणुका कुमारी दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या जबाबावरून एफआयआर दाखल करण्यात आली असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

हे ही वाचा : तुळजापूर : माजी नगराध्यक्षाने क्रूरतेचा कळस गाठला, एकाचा मर्डर अन् दुसऱ्याला काळंनिळं होईपर्यंत मारलं

वैवाहिक नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह

अशा घटना वैवाहिक नातेसंबंध, महिलांचा सन्मान आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण करतात. पोलीस तपासात समोर येणाऱ्या तथ्यांनुसार दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.