मांत्रिकाने आपल्याच मुलाची केली हत्या, 'या' भीतीपोटी दगडावर आपटून संपवले

एका मांत्रिकाने आपला मुलगाही मांत्रिक होईल या भीतीपोटी त्याची हत्या केली. याप्रकरणी अहमदाबादमधील साणंद तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची मानसिक स्थिती तपासली जात आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मांत्रिकाने स्वत:च्याच मुलाला संपवलं

point

नेमकं कारण काय?

point

जाणून घ्या सविस्तर

Crime News : गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील साणंद तालुक्यातील विंछिया गावात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आपल्या 10 वर्षांच्या मुलाने स्वतःचे आणि वडिलांचे अनुकरण करून मांत्रिक बनू नये, या भीतीने एका बापानेच आपल्या पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

पाय धरुन दगडावर आदळले

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नरेश भाई याच्या कुटुंबात त्याचे वडील आणि तो स्वतः मांत्रिकाचे काम करत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या 10 वर्षांच्या मुलाचे वागणेही मांत्रिकासारखे वाटू लागले होते. आपला मुलगा या कौटुंबिक परंपरेत अडकू नये आणि त्याने मांत्रिक बनू नये, अशी नरेशची इच्छा होती. याच विचारातून त्याने जोगणी माता मंदिरा जवळ मुलाचे पाय धरून त्याला दोन-तीन वेळा जमिनीवर आणि दगडावर आदळले, तसेच त्याच्या डोक्यावर काठीने वार करून त्याची हत्या केली.

हे ही वाचा : 'अश्विनी भिडेंना पगार देऊ नका...', सुप्रीम कोर्टाने का दिला एवढा कठोर निर्णय.. नेमकं घडलं तरी काय?

मुलगा मांत्रिक होऊ नये म्हणून...

घटनेच्या काही दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यामुळे मुलाची आई भारतीबेन तिच्या माहेरी गेली होती. मुलाची शालेय परीक्षा सुरू असल्याने ती मुलाला वडिलांच्या सांभाळात सोडून गेली होती. 1 नोव्हेंबरच्या रात्री शेजाऱ्यांनी फोन करून भारतीबेनला घटनेची माहिती दिली. ती कुटुंबीयांसह जेव्हा मंदिराजवळ पोहोचली, तेव्हा तिचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात खाटेवर पडलेला दिसला. जेव्हा तिने पतीला विचारणा केली, तेव्हा मुलाला मांत्रिक होण्यापासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले.

हे ही वाचा : 'राज्यात 72 पेक्षा भयानक दुष्काळ...' राज ठाकरेंचा मोठा निर्णय, दिवाळी साजरी करण्याबाबत काय सांगितलं?

आरोपीच्या मानसिक स्थितीची तपासणी

या प्रकरणी भारतीबेनच्या तक्रारीवरून साणंद पोलीस ठाण्यात आरोपी नरेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमची (FSL) मदत घेतली जात असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. आरोपीच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.