शिंदे गटाच्या नगरसेवकाने महिलेवर विनयभंग केल्याचा आरोप, थेट भररस्त्यात तुडवलं

मुंबई तक

Kalyan Crime news : कल्याणचे शिंदे गटाचे नगरसेवक मोहन उगले यांच्यावरही एका महिलेनं दुसऱ्यांदा विनयभंग गेल्याचा आरोप केलाय. कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात एका महिलेनं तक्रार दाखल केली.

ADVERTISEMENT

Kalyan Crime news
Kalyan Crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिंदे गटाच्या नगरसेवकावर महिलेनं विनयभंग केल्याचा आरोप

point

नगरसेवक मोहन उगले यांच्या अडचणीत वाढ?

Kalyan Crime news : देशभरातील अनेक नेत्यांचे अश्लील व्हिडिओ आता समोर येवू लागले आहेत. त्यात राज्यातील काही राजकीय नेत्यांचा समावेश आहे. नुकताच सोलापूरचे शरद पवार गटाचे नेते मनोहर सपाटे यांचा अश्लील व्हिडिओ समोर आलाय. त्यानंतर कल्याणचे शिंदे गटाचे नगरसेवक मोहन उगले यांच्यावरही एका महिलेनं दुसऱ्यांदा विनयभंग गेल्याचा आरोप केलाय. महिलेनं कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात मोहन उगले मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला. एवढंच नाहीतर उगले यांनी अनेकदा शिवीगाळही केली होती. या प्रत्युत्तरात महिलेनं भररस्त्यात नगरसेवकाला तुडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

हेही वाचा : 30 वर्षांनंतर शनीचा महायोग! 'या' राशींच्या लोकांचे फळफळेल नशीब, नोकरी आणि व्यवसायात मिळेल नफाच नफा

मोहन उगले यांच्या अडचणीत वाढ?

यामुळे मोहन उगले यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. या घटनेची कल्याणच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यावर मोहन उगले यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. 

मोहन उगले नेमकं काय म्हणाले? 

ज्या महिलेबद्दल तक्रार दाखल करण्यात आली तिला मी ओळखतंही नाही. कधी पाहिलंही नाही, काही समाजकंटकांनी तिला पुढे करुन माझ्यावर खोटे आरोप लावण्यात आले आहेत. मी गेली 15 वर्षे प्रभागात जनतेसाठी काम करतोय. सर्व पक्षांना माहितीये, की मोहन उगले असेल, तर निवडणूक जिंकणं कठीण होतं. म्हणूनच माझ्यावर षडयंत्र रचले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. यानंतरच पुढील सत्य आता समोर येईल. 

हेही वाचा : शरीरसंबंधांचे व्हिडिओ बनवण्याची पतीची पत्नीकडे मागणी, पत्नीनं दिला नकार अन् सकाळी उठताच..

दरम्यान, याआधी दोन महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या राणी कपोते यांनी मोहन उगले यांच्यावर रस्त्यात चप्पलने मारहाण करत विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, नुकताच सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मनोहर सपाटे यांचाही लॉजमधील व्हिडिओ समोर आला. मनोहर सपाटे एका महिलेवर जबरदस्ती करताना दिसत आहेत.


हे वाचलं का?

    follow whatsapp