30 वर्षांनंतर शनीचा महायोग! 'या' राशींच्या लोकांचे फळफळेल नशीब, नोकरी आणि व्यवसायात मिळेल नफाच नफा
Astrology : शनिदेव हा सर्वात शक्तीशाली ग्रह आहे. तब्बल 30 वर्षानंतर शनिचा महायोग समोर येईल. याचा फायदा तीन राशींना होणार आहे.
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव हा सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक आहे. विशेष म्हणजे तो अगदी मंद गतीने फिरतो आणि तब्बल अडीच वर्षे एका राशीत राहतो. त्याच राशीमध्ये येण्यासाठी शनिदेवाला तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. एखादा श्रीमंत व्यक्ती गरीब तर एखादा गरीब व्यक्ती श्रीमंत होण्याची शक्ती शनिकडे आहे.

2/5
सध्याचा विचार केल्यास शनि हा मीन राशीत आहे. 2027 पर्यंत मीन राशीतच राहणार आहे. जुलै 2027 मध्ये शनि मीन राशीत उलटी हालचाल करेल. तसेच सुमारे 138 दिवस अशीच परिस्थिती राहील.

3/5
मिथून राशी
मिथून राशीच्या लोकांचे नशीब पालटणार आहे. तुमच्या आयुष्यातील सुरू असलेल्या आव्हानांना तुम्ही तोंड द्याल. तसेच बराच काळ तुमचे अडकलेले काम लवकरच पूर्ण होईल. व्यवसायाच्या क्षेत्रात आपल्याला चांगला फायदा होईल. नोकरदार वर्गासाठी हा काळ फायदेशीर राहील. चांगला आर्थिक लाभ होऊन वैवाहिक जीवन चांगलं राहील.

4/5
मीन राशी
शनि ग्रह तिसऱ्या राशीत प्रवेश करेल. तसेच मीन राशीच्या धन राजयोगामुळे दीर्घकालीन प्रलंबित राहिलेलं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. बौद्धिक क्षमता वाढेल आणि मुलांच्या समस्या दूर होतील.

5/5
कुंभ राशी
कुंभ राशीच्या दुसऱ्या घरात शनीचा वास असणार आहे. आर्थिक, मानसिक, कौटुंबिक समस्येतून तुम्हाला चांगला फायदा होईल. मानसिक ताण कमी होईल आणि भविष्याबाबत महत्वाचे निर्णय घेण्यास तुम्ही पत्र राहाल.