मेहुणीचं भाऊजींवर जडलं प्रेम! बहिणीनं दोघांनाही नको त्या अवस्थेत पाहिलं..नंतर झाला राडा!

मुंबई तक

• 09:13 PM • 29 Jun 2025

Shocking Love Story Viral : भाऊजी-मेहुणीचं नातं मान सन्मानाचं असतं. पण अनेक लोक या नात्याला काळीमा फासण्याचं काम करतात. अशा प्रकारची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या रामपूरमध्ये घडली.

Extra Marital Affair Shocking News

Extra Marital Affair Shocking News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मेहुणी आणि भाऊजींच्या अफेअरमुळं खळबळ

point

भाऊजी माझ्याशिवाय राहू शकत नाही..

point

पोलीस तपासात उघड झाली संतापजनक माहिती

Shocking Love Story Viral : भाऊजी-मेहुणीचं नातं मान सन्मानाचं असतं. पण अनेक लोक या नात्याला काळीमा फासण्याचं काम करतात. अशा प्रकारची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या रामपूरमध्ये घडली. येथे एका मेहुणीने तिच्याच भाऊजीसोबत अफेअर सुरु केलं. तिच्या बहिणीला जेव्हा याबाबत कळलं, तेव्हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाला. त्यानंतर तिने स्वत: छोट्या बहिणीचं नातं पतीसोबत जुळवलं आणि ती माहेरी निघून गेली. 

हे वाचलं का?

मुलगी माहेरी निघून गेली म्हणून कुटुंबियांनी यामागचं कारण शोधलं. जेव्हा त्यांना सत्य कळलं, तेव्हा ते थेट पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना अजीमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुरसैना येथील एका तरुणाचं लग्न एक वर्षापूर्वी खौद येथील तरुणीसोबत झालं होतं. लग्नाच्या काही दिवसानंतर तरुणाचं मेहुणीसोबत अफेअर सुरु झालं. पण कुटुंबियांना याबाबत कळलंच नाही. पण दोन दिवसानंतर तरुणाच्या पत्नीने तिच्या बहिणीला संशयास्पद स्थितीत पाहिलं. तेव्हा तिला पतीच्या आणि बहिणीच्या अफेअरबाबत समजलं. 

हे ही वाचा >> "जो हिंदीचा विषय आहे, आमच्यासाठी तो...", CM फडणवीसांचं सर्वात मोठं विधान! पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

भाऊजी माझ्याशिवाय राहू शकत नाही..

पत्नीने छोट्या बहिणीला याबाबत विचारलं तेव्हा तिने म्हटलं, माझं भाऊजींवर प्रेम आहे. भाऊजीही माझ्याशिवाय राहू शकत नाही. भाऊजी आणि मेहुणीच्या प्रेमप्रकरणाबाबत समजल्यानंतर पत्नीचा पारा चढला. काही वेळानंतर त्यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाला. त्यानंतर पत्नीने तिच्या छोट्या बहिणीला भाऊजींकडे नेलं आणि म्हणाली, जा तुम्ही जगा तुमचं आयुष्य. त्यानंतर ती महिला तिच्या माहेरी निघून गेली. 

माहेरच्या लोकांनी पत्नीला याबाबत सर्व सांगितलं तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यानंतर पोलिसांनाही हादरा बसला. भाऊजींचा शोध घेण्यासाठी पोलीस गावात पोहोचले, तेव्हा आरोपी संपूर्ण कुटुंबासह आधीच फरार झाला होता. तर घरी असलेली मेहुणी पोलिसांना म्हणली, मी अजून अल्पवयीन आहे. माझा निर्णय मी स्वत: घेऊ शकते. भाऊजींवर माझं प्रेम आहे. त्यांच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही.

हे ही वाचा >> मराठी कामगारांना कामावरून काढून टाकण्याची कंत्राटदाराची धमकी