Maharashtra Weather: कोकणासह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पाऊस घालणार धुमाकूळ, जाणून घ्या आजचं हवामान

मुंबई तक

• 07:00 AM • 29 Jun 2025

Maharashtra Weather Update : 29 जून रोजी हवामानाची एकूण परिस्थिती आणि राज्यातील मान्सूनचे महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा समावेश आहे.

maharashtra weather update heavy rain in these part of maharashtra and flood situation in konkan

maharashtra weather update heavy rain in these part of maharashtra and flood situation in konkan

Google CTA

बातम्या हायलाइट

point

(IMD) विभागाने हवामानचा अंदाज वर्तवला

point

जाणून घ्या हवामानाची एकूण परिस्थिती

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान खात्याच्या (IMD) विभागाने हवामानचा अंदाज वर्तवला आहे. 29 जून रोजी हवामानाची एकूण परिस्थिती आणि राज्यातील मान्सूनचे महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा समावेश आहे. या भागातील जिल्ह्यांच्या मान्सूनचे अपडेट्स पुढील प्रमाणे नमूद करण्यात आले आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : शरीरसंबंध ठेवतानाचे व्हिडिओ बनवण्याची पतीची पत्नीकडे मागणी, पत्नीनं दिला नकार अन् सकाळी उठताच..

कोकण

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. किनारपट्टी भागात विजांचा कडकडाट, पूर आणि भूस्खलनाचा धोका असल्याने किनारपट्टीवरील रहिवाशांना सावधानतेचा इशारा.

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि साताऱ्याच्या घाट माथ्यावर पाऊस कहर करणार असल्याची शक्यता आहे. इतर भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच घाटमाथ्यावक पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मराठवाडा

मराठवाड्यात मध्यम ते जोराचा पाऊस कोसळणार आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस थैमान घालेल. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पिकांच्या व्यवस्थापनासाठी हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा. 

हेही वाचा : 4 मुलांची आई असलेली रिता अनैतिक संबंधामुळे नको ते करून बसली, थेट पतीसोबत...

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र 

विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस थैमान घालणार आहे. 

तर उत्तर महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. 

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा हवामान विभागाने सल्ला दिलेला आहे. तसेच पूर आणि भूस्खलनासारखे धोके निर्माण होण्याची शक्यता असेल. घाटमाथा आणि किनारपट्टीच्या भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी.