Weather Alert : मुंबईसह ठाण्यात अलर्ट जारी! हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई तक

14 Jul 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 02:29 PM)

हवामान विभागातून पावसासंदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांना गरज असल्यासच त्यांनी घराबाहेर पडावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

weather forecast heavy rain alert in mumbai thane next 2-3 hours

weather forecast heavy rain alert in mumbai thane next 2-3 hours

follow google news

राज्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाळा दाखल झाला होता.मात्र आता जुलैचा पंधरवडा उलटत आला असला तरी अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र हवा तसा पाऊस अद्याप बरसलाच नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. असे असतानाच आता हवामान विभागातून पावसासंदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांना गरज असल्यासच त्यांनी घराबाहेर पडावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. (weather forecast heavy rain alert in mumbai thane next 2-3 hours)

हे वाचलं का?

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाची रिपरिप सुरु आहे.मात्र मुसळधार पाऊस काहीसा दुरच आहे. त्यात आता हवामान विभागाने पावसाची मोठी अपडेट दिली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत आता येत्या 2 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या काही तासांमध्ये मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढण्याची वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पावसासंबंधित महत्वपुर्ण माहिती दिली आहे. येत्या 2 ते 3 तासात मुंबई, ठाण्यात मध्यम किंवा तीव्रतेचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्य़ात आली आहे. यासह कोकणसह पश्चिम किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून येत्या 4-5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येलो अलर्ट जारी

विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र वगळता मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली या परिसरात पाऊस कमी झाला आहे. मात्र येत्या 4-5 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह मराठवाडा आणि इतर काही भागात विजांच्या कड़कडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह कोकणात सुद्धा येत्या 24 तासांत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यात आहे. हा पाऊस 3 ते 4 दिवस कायम राहणार आहे, असे देखील होसाळीकर यांनी ट्विट करून सांगितले आहे.

    follow whatsapp