SSC 10th Board Result : 'या' 9 वेबसाईट्सवर पाहता येईल दहावीचा निकाल! साईट डाऊन झाली तरी नो टेन्शन

SSC Board Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीची परीक्षा मार्च महिन्यात पार पडली. त्यानंतर 5 मे रोजी बारावीचा निकाल घोषित करण्यात आला.

SSC Result 2025 Latest Update

SSC Result 2025 Latest Update

मुंबई तक

• 03:57 PM • 08 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

दहावीचा निकाल कधी जाहीर होणार?

point

दहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळांना भेट द्या

point

दहावीच्या निकालाबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट

SSC Board Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीची परीक्षा मार्च महिन्यात पार पडली. त्यानंतर 5 मे रोजी बारावीचा निकाल घोषित करण्यात आला. अशातच आता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना एसएससी निकालाची प्रतिक्षा लागली आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून लवकरच दहावीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. mahasscboard.in या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल घोषित केला जाईल. दरम्यान, दहावीचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हे वाचलं का?

या संकेतस्थळावर पाहता येईल दहावीचा निकाल

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीचा निकाल खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट्सवर ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाऊ शकतो. 

हे ही वाचा >> 8th May Gold Rate : ऑपरेशन सिंदूरनंतर सोन्याचे भाव भिडले गगनाला! तुमच्या शहरात काय आहेत सोन्याचे दर? जाणून घ्या

1) https://results.digilocker.gov.in
2) https://mahahsscboard.in
3) http://hscresult.mkcl.org
4) https://results.targetpublications.org
5) https://results.navneet.com
6) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
7) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hse-12-results
8) https://www.indiatoday.in/education-today/results 
9) https://www.aajtak.in/education/board-exam-results

हे ही वाचा >>  बेस्ट कंडक्टरनं मुलाचा गळा दाबला, त्याला खाली आपटून मारलं; नंतर स्वत:ला संपवलं! प्रकरण काय?

दहावीच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण या अधिकृत वेबसाईट्सच्या माध्यमातून पाहता येतील. तसच डिजीलॉकर अॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका सेव्ह सुद्धा करून ठेवली जाणार आहे. https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होऊ शकतो.

महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या गुणपत्रिका ऑनलाइन मिळविण्यासाठी, विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर त्यांचा रोल/सीट क्रमांक आणि त्यांच्या आईचे पहिले नाव प्रविष्ट करावे लागेल. ही माहिती प्रवेशपत्र किंवा हॉल तिकिटावर उपलब्ध असेल. तथापि, जर तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र मिळाले नसेल, तर तुम्ही तुमच्या शाळेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता आणि सीट नंबरबाबत मदत मागू शकता. 

    follow whatsapp