बेस्ट कंडक्टरनं मुलाचा गळा दाबला, त्याला खाली आपटून मारलं; नंतर स्वत:ला संपवलं! प्रकरण काय?
मृत शरदचे वडील जवळच राहतात. घरी पोहोचताच दोघांचे मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकरली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पालघरमध्ये घडलेल्या घटनेनं सगळेच हादरले

कंडक्टरने मुलाचा गळा दाबून नंतर त्याला जमिनीवर आपटलं

प्रकरण नेमकं काय? पोलीस काय म्हणाले?
Palghar : बेस्टमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं धक्कादायक कृत्य केलं आहे. या कर्मचाऱ्यानं आपल्या 15 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पालघरमधील आदिवासी बहुल गावात घडलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, मृत व्यक्ती मुंबईच्या बेस्ट बसचा कंडक्टर म्हणून काम करत होता. गेल्या तीन महिन्यांपासून त्याला निलंबित करण्यात आलं होतं. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. प्राथमिक तपासात हे प्रकरण हत्या आणि आत्महत्या असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
बेस्टमधून करण्यात आलं होतं निलंबित
बुधवारी पालघरच्या आदिवासी बहुल जव्हार तालुक्यातील पिंपळशेठ गावात ही घटना घडली. मृत व्यक्तीचं नाव शरद भोये (40) आहे. जो बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) मध्ये कंडक्टर म्हणून काम करत होता. शरद गेल्या तीन महिन्यांपासून निलंबित होता आणि त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता.
हे ही वाचा >> सोफियाच नाही, तर त्यांचे वडील आणि आजोबाही होते सैन्यात; म्हणाले, संधी मिळाली तर पाकिस्तानला...
पोलीस उपनिरीक्षक अनिल दिघोळे यांनी सांगितलं की, शरद भोये त्याच्या शेतातल्या घरी गेला होता. दहावीत शिकणारा त्याचा मुलगा भावेश भोये शाळेतून घरी परतला तेव्हा शरदने त्याचा गळा दाबून खून केला.
मुलाचा गळा दाबला, जोरात खाली आपटलं
पोलीस तपासात असे दिसून आलं की, गळा दाबल्यानंतर शरदने त्याच्या मुलाला जमिनीवर आपटलं. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर शरद घराच्या दुसऱ्या खोलीत गेला आणि त्यानं छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृत शरदचे वडील जवळच राहतात. घरी पोहोचताच दोघांचे मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकरली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून, मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा >> "त्याचे दोन भाऊ सैन्यात, त्याच्या मुलालाही...", शहीद जवान दिनेश शर्मांचे वडील काय म्हणाले?
निलंबनामुळे शरद भोये बऱ्याच दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. कुटुंबातील इतर सदस्यांचीही चौकशी केली जातेय. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. सरकारी नोकरीत असलेला एक सुशिक्षित व्यक्ती असं पाऊल कसं उचलू शकतो, याचा लोकांना धक्का बसला आहे.