सोफियाच नाही, तर त्यांचे वडील आणि आजोबाही होते सैन्यात; म्हणाले, संधी मिळाली तर पाकिस्तानला...
Sofia Kuraishi : कर्नल सोफियाने 1997 मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि लष्कराच्या सिग्नल कॉर्प्समध्ये सामील झाल्या. 2016 मध्ये, त्यांनी 'फोर्स 18' नावाच्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय लष्करी तुकडीचं नेतृत्व करून इतिहास रचला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोफिया कुरैशीच्या कुटुंबात सैन्यात भरती होण्याची परंपरा
सोफिया कुरैशी यांनी शिक्षण सोडून निवडला सैन्यात भरती होण्याचा पर्याय
Sofia Kuraishi Biography : पहलगामध्ये निष्पाप भारतीयांवर झालेल्या हल्ल्याचा बदला पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करुन घेण्यात आला. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पहलगाममधील गुन्हेगारांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानतंर बुधवारी सकाळी जेव्हा कर्नल सोफिया कुरेशी यांनी भारतीय सैन्याच्या वतीने हल्ल्याची माहिती दिली तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटला. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्याची ताकद आणि शौर्य जगासमोर मांडलं. काल दिवसभर भारतीय सैन्याच्या या दोन महिला अधिकाऱ्यांची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.
हे ही वाचा >> पाकिस्तान पुन्हा हादरला! लाहोरला तीन मोठे स्फोट, सायरन वाजला, लोक पळत सुटले, घटना काय?
गुजरातमधील वडोदरामध्ये राहणारे सोफिया यांचे वडील हे सगळं पाहून खूप आनंदात आहेत. कर्नल सोफिया कुरेशी यांचे वडील ताज मोहम्मद कुरेशी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, आम्हाला आमच्या मुलीचा अभिमान आहे. तिने देशासाठी काहीतरी केलं. ताज मोहम्मद यांनी सांगितलं की, मी सुद्धा बांगलादेशच्या मुक्तीसाठी झालेल्या युद्धात लढलो आहे. आता मनात फक्त एकच गोष्ट येते, की जर मला संधी मिळाली, तर मी त्यांना (पाकिस्तान) संपवून टाकेन. पाकिस्तान हा राहण्यासाठी योग्य देश नाही.
कुरैशी म्हणाले, "सैन्यात भरती होणं ही आमच्या कुटुंबाची परंपरा आहे. माझे म्हणजे सोफियाचे आजोबाही सैन्यात होते. त्यानंतर मी सुद्धा लष्करात होतो आणि आता माझी मुलगी ही परंपरा पुढे चालवतेय. ताजुद्दीन कुरैशी पुढे म्हणाले, आम्ही फक्त देशाचा विचार करतो. आमचा विचार 'वयम् राष्ट्र जागरणम्' आहे. आम्ही आधी भारतीय आहोत, नंतर इतर काहीही."
हे ही वाचा >> "त्याचे दोन भाऊ सैन्यात, त्याच्या मुलालाही...", शहीद जवान दिनेश शर्मांचे वडील काय म्हणाले?
वडोदराच्या रहिवासी असलेल्या कर्नल सोफिया यांनी एकेकाळी प्राध्यापक होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण देशभक्तीच्या भावनेनं त्यांना सैन्यात जाण्यास भाग पाडलं. त्यांचा भाऊ मोहम्मद कुरैशी यांनी सांगितलं की, सोफिया पीएचडी पूर्ण करणार होती. तेव्हाच तिने भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला.










