Maratha Reservation: 'त्या' मागण्या मान्य अन् जरांगेंनी उपोषण सोडलं, मराठा तरूणांना दिला 'हा' आदेश!
Maratha Reservation High Court Hearing: मुंबईतील आझाद मैदान आणि परिसर हा आज (2 सप्टेंबर) 3 वाजतेपर्यंत मोकळा करण्यात यावा असे आदेश हायकोर्टाने दिले होते. ज्यानंतर आता पुन्हा एकदा कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. पाहा सुनावणीत नेमकं काय घडतंय.

मुंबई: मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात जे आंदोलन पुकारण्यात आलं ते बेकायदेशीर आहे. अशी टिप्पणी हायकोर्टाने केली होती.ज्यानंतर कोर्टाने सरकारला आज (2 सप्टेंबर) दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई मोकळी करावी असे आदेश दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोर्टात सुनावणी सुरू झाली. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी जी उपसमिती नेमण्यात आली होती त्या समितेने जो मसुदा तयार केला होता तो मनोज जरांगे यांना पहिल्याच चर्चेत मान्य झाला. तसंच याबाबत तीन जीआर काढण्यात यावे असंही ठरलं. त्यानंतर पहिला जीआर सरकारने जारी केल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सोडलं.
मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते लिंबू-पाणी घेत मनोज जरांगे यांनी मुंबईतील आपलं आमरण उपोषण सोडलं. त्याचवेळी त्यांनी सर्व मराठा आंदोलकांना मुंबई सोडून आपआपल्या गावी परतण्यासही सांगितलं.
जरांगेंनी उपोषण सोडण्याआधी नेमकं काय-काय घडलेलं?
एकीकडे हायकोर्टात सुनावणी सुरू असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी सरकारने जी उपसमिती गठीत केली आहे त्यातील सदस्य हे आता आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत.
हे ही वाचा>> 'दुपारी 3 वाजेपर्यंत रस्ते रिकामे करा अन्यथा...' हायकोर्टाचा सरकारला आदेश, आता उरला अवघा अर्धा तास.. मुंबईत काय सुरू?
उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील हे स्वत: आझाद मैदानावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि इतर काही मंत्री आणि उपसमितीमधील काही सदस्यही जाणार आहेत.
याबाबत माहिती देताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितलं की, आम्ही मसुदा तयार केला आहे. त्याबाबत आम्ही मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करू असं ते म्हणाले.
हे ही वाचा>> जरांगेंची मागणी पूर्ण होऊ शकते का? जर उत्तर 'हो' असेल, तर मराठा समाजाला नेमकं किती मिळेल आरक्षण?
हायकोर्टात पुन्हा सुनावणी सुरू, पाहा कोर्टात नेमकं काय घडतंय?
- सगळी वाहने काढायला सुरुवात झाली - मानेशिंदे (मनोज जरांगेंचे वकील)
- फक्त खाद्यपदार्थांची आणि पाण्याची वाहने आहेत - मानेशिंदे
- उपसमिती जरांगेच्या भेटीला जात आहे - मानेशिंदे
- वाहने अद्याप तिथेच आहेत - महाअधिवक्ता
- यावर वाद नको, संध्याकाळपर्यंत सोल्यूशन येईल- मानेशिंदे
- माझी विनंती आहे, परवाच्या दिवशी सुनावणी घ्या - मानेशिंदे
- मोठ्या संख्येने लोक तिथून सोडून गेली आहेत - मानेशिंदे
- ते व्हायलाच पाहिजे - कोर्ट
- पण दुसरा मुद्दा आणखी एक आहे, तिथेच का - कोर्ट
- तुम्ही दुसरीकडे जाऊनही राहू शकतात - कोर्ट
- तुम्हाला चोवीस तासांची मुदत देण्यात आली होती - कोर्ट
- कायद्याचे पालन करणारे म्हणून तुम्ही जागा सोडायला हवी होती - कोर्ट
- पाच हजार लोक तुमच्यासोबत राहू शकत नाहीत - कोर्ट
- चोवीस तासाननंतर तुम्हाला कोणता अधिकार आहे - कोर्ट
- तुमच्या समर्थकांना तात्काळ मुंबई सोडायला सांगा - कोर्ट
- त्यांना शहरातच थांबायला सांगू शकत नाही - कोर्ट
- त्यांना कुठलीही परवानगी नाही - कोर्ट
- काही लोक सोडून बाकी सगळे निघतील - मानेशिंदे
- त्यांनी तुमचा सल्ला मानला पाहिजे - कोर्ट
- जरांगेंचे सगळे आदेश पाळत आहेत - मानेशिंदे
- त्यांना सुचना दिल्या जातील - मानेशिंदे
- तुमच्या सुचना पुरेशा नाहीत - कोर्ट
- खरंतर हे सगळं कोर्टात यायला नको होते - कोर्ट
- देशाचे कायद्यांचे पालन हे झालेच पाहिजे – कोर्ट
- आम्हाला जबरदस्तीचे आदेश द्यायचे नाहीत – कोर्ट
- तुम्ही केलेली विधानं तुम्हाला बंधनकारक आहेत - कोर्ट
- अडचणी येऊ शकतात पण... आमच्या निर्णयावर त्याचा परिणाम होणार नाही – कोर्ट
- कोणच्यातरी हातात अधिकार आहेत – कोर्ट
- मराठा आरक्षणाच्या याचिकेत तुम्ही पक्षकारही नाहीत – कोर्ट
- याला आधार काय, तुम्ही अशी मागणी कशी करू शकतात? - कोर्ट
- कुठलीही विधानं करू नका, सरकारवर विश्वास ठेवा – कोर्ट
- वीरेंद्र पवार हे आयोजक नाहीतर तर स्वंयसेवक आहेत – मानेशिंदे
- आम्ही उचललेल्या पावलांसंदर्भातील शपथपत्र माझ्याकडे आहे – महाधिवक्ता
- कोर्ट निर्देशांविषयी पोलिसांकडून सगळीकडे सूचना केल्या जात आहे – महाधिवक्ता
- बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत – महाधिवक्ता
- LED स्क्रीनवर दाखवलं जातं आहे, घोषणा केल्या जात आहेत - महाधिवक्ता
- अनेक वाहनं आता गेली आहेत, उर्वरीत लोकांशी संवाद सुरू आहे – महाधिवक्ता
- कोर्टाच्या आदेशांचे पालन करण्याविषयी पोलिसांकडून विनंती केली जातेय – महाधिवक्ता
- जरांगेंना आणि इतरांना नोटीस देण्यात आलेली आहे – महाधिवक्ता
- जरांगेंनी जर आवाहन केले तर स्थिती सुधारेल – महाधिवक्ता
- त्यांनी मर्यादित संख्येत आंदोलन करायला हवे,तर त्यांना परवानगी मिळेल – महाधिवक्ता
- पोलिसांच्या आवाहनाचा परिणाम होतोय मात्र... – महाधिवक्ता
- जरांगेंनी आवाहन केल्यास त्याचा जास्त परिणाम होईल - महाधिवक्ता
- अच्छा तर मग तुम्ही जरांगेंच्या लोकप्रियेतवर अवंलबून आहात – कोर्ट
- खरं तर ती तुमची जबाबदारी होती – कोर्ट
- पाच हजारांवर संख्या गेली तेव्हाच तुम्ही कोर्टात यायला हवे होते – कोर्ट
- तुमच्यामुळेच ही स्थिती उद्भवली आहे – कोर्ट
- तुमच्याविरोधात आम्ही आदेश पारित करू शकतो – कोर्ट
- आम्ही (सरकारवर) अत्यंत नाखूष आहोत – कोर्ट
- अनेक दिवस कोर्टाच्या आदेशांचे पालन झालेले नाही – कोर्ट
- या आदेशातील मुद्दे अत्यंत गंभीर दिसतायत - कोर्ट