पाकिस्तानी सैन्याची गाडी रिमोट बॉम्बने उडवली, 7 जणांच्या चिंधड्या उडाल्या... BLA ने केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ
BLA ने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. हा हल्ला केच जिल्ह्यातील किलाग भागात झाला होता. पाकिस्तानी सैन्याच्या पथकालाच इथेही टार्गेट करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पाकिस्तानी सैन्याची गाडी धाडकन उडवली

रस्त्यात भुसुरूंग पेरून रिमोटने उडवली गाडी

पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करणारे BLA कोण?
BLA Attack on Pak Army : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलेला होता. भारतानं याचं चोख उत्तर देत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळं उध्वस्त केले. त्यानंतर आता जगाचं लक्ष सध्या भारत-पाकिस्तानवर आहे. अशातच पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढलेल्या आहे. भारताच्या हल्ल्यानं हादरलेल्या पाकिस्तानात आता बलुच बंडखोरांनीही सैन्यावर हल्ला केला आहे. गेल्या 24 तासांत बलुचांनी पाकिस्तानी सैन्यावर केलेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. या हल्ल्यामध्ये 7 सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
पाकिस्तानी सैनिकांच्या चिंधड्या उडवल्या
हे ही वाचा >> पहलगाम हल्ल्यात डोळ्या देखत पती घेतला हिरावून, Operation Sindoor नंतर हिमांशी नरवाल काय म्हणाली?
पाकिस्तानमध्ये असलेल्या बोलानच्या मचकुंडमध्ये हा हल्ला करण्यात आला. बलुच लिबरेशन आर्मीच्या (BLA) स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने पाकिस्तानी सैन्याच्या वाहनाला लक्ष्य करून हल्ला केला. पाकिस्तानी सैन्याच्या वाहनाला रिमोटने थेट उडवून देण्यात आलं. पाकिस्तानी सैन्य लष्करी कारवाईची तयारी करत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 7 पाकिस्तानी सैनिकांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्याचं समोर आलंय. सोशल मीडियावर तसा एक व्हिडीओ समोर आलाय.
यापूर्वीही BLA ने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. हा हल्ला केच जिल्ह्यातील किलाग भागात झाला होता. पाकिस्तानी सैन्याच्या पथकालाच इथेही टार्गेट करण्यात आलं होतं.
हे ही वाचा >> 'सीमा हैदरला पाकिस्तानमध्ये हाकलून द्या..', असं म्हणालेले लोक, त्याच सीमाने 'ऑपरेशन सिंदूर'वर..
बलुचिस्तानबद्दल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी म्हणाले, बलुचिस्तान हा जंगली घोड्यासारखा आहे. ज्यावर आता पाकिस्तानचा कोणताही ताबा राहिलेला नाही. अशा काळात तो आणखी जंगली होतो.