'सीमा हैदरला पाकिस्तानमध्ये हाकलून द्या..', असं म्हणालेले लोक, त्याच सीमाने 'ऑपरेशन सिंदूर'वर..

मुंबई तक

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा पाकिस्तानात पाठवा अशी मागणी केली जात होती. अशातच पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरनं ऑपरेशन सिंदूर हल्ल्यावरून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिलीय.

ADVERTISEMENT

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमा हैदरची सोशल मीडिया पोस्ट
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमा हैदरची सोशल मीडिया पोस्ट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पहलगाम हल्ल्यानंतर सीमा हैदरनं प्रतिक्रिया दिलीय

point

पहलगाम हल्ल्यानंतर 15 दिवसानंतर भारतानं पाकिस्तानला पाणी पाजलंय.

point

या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 ठिकाणी हल्ले केले

Operation Sindoor: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 15 दिवसातच भारतानं पाकिस्तानला पाणी पाजलंय. या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत. अशातच आता देशातील लोक याचं कौतुक करत आहेत. अशातच आता पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरनं प्रतिक्रिया दिलीय.

हेही वाचा : 450 किमीची रेंज, बंकर्सही फोडतं... एअर स्ट्राईकमध्ये भारताने वापरलेलं 'स्काल्प आणि हॅमर' कसं काम करतं?

सोशल मीडियाद्वारे सीमा हैदरची प्रतिक्रिया 

या झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या Seema_Sachin10 युजर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.  ज्यात सीमा हैदरनं हिंदुस्तान जिंदाबाद, जय हिंद, जय भारत असं म्हणत पोस्ट शेअर केली आहे. तर तिनं दुसऱ्या एका पोस्टमध्ये जय हिंद, ऑपरेशन सिंदूर, इंडियन आर्मी अशी पोस्ट केली आहे. अनेकदा सीमा हैदरला भारतातून पाकिस्तानात पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. अशातच सीमा हैदरच्या नागरिकतेबाबत भारताच्या केंद्र सरकारनं योग्य ते पाऊल उचलावं. मात्र, सरकार यावर पाऊल उचलत नसल्याचं बोललं जात होतं.

या प्रकरणात पहलगाम हल्ल्याबाबत सीमा हैदरनं दु:ख व्यक्त केलं होतं. सीमा हैदरचे वकील एपी सिंहने सांगितलेलं की, पहलगाममधील हल्ल्यानंतर सीमाच्याही भावना दुखावल्या होत्या. पहलगाममधील हल्ल्यादरम्यान निष्पाप पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. 

दरम्यान, सीमा हैदर एक पाकिस्तानी नागरिक आहे. 13 मे 2023 रोजी ती नेपाळच्या अवैधमार्गे घुसखोरी करत तिनं भारतात प्रवेश केला होता. ती भारतातील सचिन मीणा नावाच्या एका युवकाला भेटण्यास आली होती. दरम्यान, त्यांनी विवाह करत त्यांच्या संसाराला सुरूवात केली होती. आता तिनं एका मुलीला जन्मही दिला आहे. 

हेही वाचा : 'ऑपरेशन सिंदूर'ची धुरा सांभाळणारी रणरागिणी व्योमिका सिंह आहे तरी कोण?

मात्र, या पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांनी पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा पाकिस्तानात पाठवा असा आवाज उठवला होता. अशातच सीमा हैदरला पाकिस्तानात पुन्हा पाठवा अशा मागणीनं जोर धरला होता. यावर जिल्हा प्रशासनाकडून सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवलं जाणार की नाही याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp