450 किमीची रेंज, बंकर्सही फोडतं... एअर स्ट्राईकमध्ये भारताने वापरलेलं 'स्काल्प आणि हॅमर' कसं काम करतं?

मुंबई तक

Scalp Hammer Weapons :  या हल्ल्यांमुळे जैशणि लष्कर आच्या मुख्यालयांचा पूर्णपणे नाश झाला. पुलवामा आणि पाहलगाम हल्ल्यांमागे असलेली अतिरेकी याच ठिकाणहून पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारताने पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे तळं अचूकपणे कसे टार्गेट केले?

point

एअर स्ट्राईकमध्ये भारतानं नेमके कोणते शस्त्र वापरले?

India Air Strikes on Pakistan : भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करून दहशतवादाला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सूत्रांनुसार, भारतीय हवाई दलानं राफेल लढाऊ विमानांवर तैनात असलेल्या स्काल्प क्रूझ क्षेपणास्त्रे आणि हॅमर ( Precision-Guided Munitions) शस्त्रांचा वापर केला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत रात्री एक वाजता पाकिस्तानातील बहावलपूर आणि मुरिदके यासह नऊ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. ही ठिकाणं जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांचं बेस मानले जात होते.

हे ही वाचा >> "आम्ही झोपेत असताना 4 ड्रोन आले आणि सगळंच...", एअर स्ट्राईक्स पाहिलं, तो पाकिस्तानी काय म्हणाला?

पहलगाममधील पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 25 पर्यटक आणि एका स्थानिक व्यक्तीचा मृत्यू झाला होता. भारतीय हवाई दलासह नौदल आणि लष्करानेही या कारवाईत सहभाग घेतला होता. 2019 च्या बालाकोट हल्ल्यात भारतानं जुनी मिराज 2000 विमाने वापरली होती, पण यावेळी राफेल विमानांनी भारताची ताकद वाढवली आहे.

 

स्काल्प/स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्र का आहेत खास? 

स्काल्प (स्टॉर्म शॅडो) म्हणून ओळखलं जाणारं क्रूझ क्षेपणास्त्र  हवेतून सोडलं जातं. हे क्षेपणास्त्र खास वैशिष्ट्यांमुळं आणि लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. 450 किमीची रेंज असलेली ही क्षेपणास्त्र कोणत्याही परिस्थितीत (रात्रीच्या अंधारात तसंत खराब हवामानात) अचूक काम करतात. INS, GPS आणि टेरेन रेफरन्सिंग यासारख्या प्रगत नेव्हिगेशन सिस्टममुळे हे क्षेपणास्त्र अचूक काम करतात. 

MBDA या युरोपियन कंपनीने बनवलेलं हे क्षेपणास्त्र कठीण बंकर्स आणि शस्त्रसाठ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी खास आहे. गेल्या वर्षी युक्रेनने रशियातील टार्गेट्सवर हल्ला करण्यासाठी याच क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. 450 किलो वजनाचं वॉरहेड घेऊन जाणारं हे क्षेपणास्त्र कमी उंचीवर उडत असल्यानं शोधणंही कठीण जातं.

हॅमर एअर-टू-ग्राउंड बॉम्ब

हॅमर (Highly Agile Modular Munition Extended Range) हे सर्व हवामानात काम करणारं आणि दिलेल्या टार्गेटवर अचूकपणे मारा करणारं शस्त्र आहे. 70 किमी पल्ल्याचं हे ग्लाइड बॉम्ब 250 किलो, 500 किलो आणि 1,000 किलोच्या बॉम्बवर बसवलं जाऊ शकतं. फ्रेंच कंपनी सॅफरानने बनवलेलं हे शस्त्र जॅमिंगला प्रतिरोधक आहे. कमी उंचीवरून खडबडीत भूप्रदेशातही ते सोडलं जाऊ शकतं. कठीणातल्या कठीण गोष्टींना भेदून ते मारा करतं. 

हे ही वाचा >> निष्पापांचे बळी घेणाऱ्या मसूद अजहरचं संपूर्ण कुटुंब ठार, Air Strike मध्ये कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू

दरम्यान,  या हल्ल्यांमुळे जैशणि लष्कर आच्या मुख्यालयांचा पूर्णपणे नाश झाला. पुलवामा आणि पाहलगाम हल्ल्यांमागे असलेली अतिरेकी याच ठिकाणहून पाठवण्यात आल्याची माहिती आहे. भारतानं अचूक शस्त्रांचा वापर करून दहशतवादी पायाभूत सुविधांचा नाश केला. तसंच सामान्य पाकिस्तानी नागरिकांचं नुकसान होणार नाही याचीही काळजी घेतली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp