"आम्ही झोपेत असताना 4 ड्रोन आले आणि सगळंच...", एअर स्ट्राईक्स पाहिलं, तो पाकिस्तानी काय म्हणाला?
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. नऊ ठिकाणांपैकी चार ठिकाणं पाकिस्तानात होती, तर उर्वरित पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पाकिस्तानमधील 9 ठिकाणांवर दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला

भारताच्या सिंदूर ऑपरेशमुळे हादरला पाकिस्तान
Air Strikes on Pakistan : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये हवाई हल्ले करून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला आहे. ही कारवाई भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे केली. या हल्ल्यासाठी हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. एका पाकिस्तानी व्यक्तीनं प्रत्यक्ष पाहिलेलं सगळं माध्यमांना सांगितलं आहे.
हे ही वाचा >> 'पाकिस्तानमधून भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात...' ऑपरेशन सिंदूरनंतर Army च्या पत्रकार परिषदेत मोठं विधान
रात्रीच्या वेळी हल्ला कसा झाला हे प्रत्यक्षदर्शीने सांगितलं?
पाकिस्तानातील मुरीदकेमध्ये एका स्थानिक प्रत्यक्षदर्शीनं सगळं सांगितलं. या व्यक्तिने दहशतवादी छावण्यांवर हल्ला झालेलं स्वत: पाहिलं आहे. 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल बोलताना त्यानं सांगितलं की, चार ड्रोन पाहिले होते. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ अड्ड्यांवर अचूक हवाई हल्ले केले. रॉयटर्सशी बोलताना, पाकिस्तानी व्यक्ती म्हणाला, "रात्री सुमारे 12:45 वाजले होते, आम्ही झोपलो होतो... आधी एक ड्रोन आला, नंतर आणखी तीन ड्रोन आले आणि त्यांनी हल्ला केला... सगळं काही उद्ध्वस्त झालं."
भारताने 25 मिनिटात केलं टार्गेट पूर्ण
भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी हल्ले केले. सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितलं की, या अचूक हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद (JEM), लष्कर-ए-तोयबा (LET) आणि हिजबुल मुजाहिदीन या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित 80 हून अधिक दहशतवादी मारले गेले. ऑपरेशन सिंदूर नावाचा हा हल्ला 25 मिनिटं चालला. या कारवाईमध्ये हवाई, नौदल आणि सैन्याचा सहभाग होता.
हे ही वाचा >> पाकिस्तानी लोकं सर्च करतायत 'सिंदूर म्हणजे काय?', काय माहिती समोर आली पाहा...
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आला. नऊ ठिकाणांपैकी चार ठिकाणं पाकिस्तानात होती, तर उर्वरित पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये होती. सूत्रांनी सांगितलं की, या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्य, आयएसआय आणि स्पेशल सर्व्हिस ग्रुप (SSG) सहभागी होते. दहशतवादी प्रशिक्षण पायाभूत सुविधांना पाठिंबा देण्यात या घटकांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.