पाकिस्तानी लोकं सर्च करतायत 'सिंदूर म्हणजे काय?', काय माहिती समोर आली पाहा...
Operation Sindoor : पाकिस्तानी लोकं सर्च करतायत 'सिंदूर म्हणजे काय?' गूगल ट्रेंडनुसार महत्त्वाचे किवर्ड्स समोर आलेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या भारताचं प्रत्युत्तरात.

पाकिस्तानात सर्वाधिक सिंदूर हे नाव गूगलवर सर्च केलं गेल्याची माहिती वृत्तांनी दिलीय.

सिंदूरबाबत लोकांना अधिकची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागलीय.
Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात 7 मे 2025 रोजी मध्यरात्री भारताने पाकड्यांवर हल्ला केला. या हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलंय. य हल्ल्यादरम्यान भारताने 9 ठिकाणांवर हल्ला केलाय. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान बिथरलं असल्याचं बोललं जातंय. अशातच आता पाकिस्तानी गूगलवरती सिंदूर असं नाव सर्च करतंय.
हेही वाचा : जिथे एअर स्ट्राईक केला, ते ठीकाण का निवडलं, 'मरकज सुभान अल्लाह'मध्ये नेमकं काय? A टू Z स्टोरी
भारतानं जिथं हल्ला केला त्यापैकी एका ठिकाणाचं नाव सिंदूर आहे. आता याच सिंदूरबाबत लोकांना अधिकची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागलीय. पाकिस्तानी लोक ऑपरेशन सिंदूरविषयी गूगलवर सर्च करून एकूण माहिती जाणून घेत आहेत. त्यांचा स्क्रिनशॉट खालीलप्रमाणे देण्यात आलेत.