'पाकिस्तानमधून भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात...' ऑपरेशन सिंदूरनंतर Army च्या पत्रकार परिषदेत मोठं विधान

मुंबई तक

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एक मोठं विधान करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

ऑपरेशन सिंदूरनंतर Army च्या पत्रकार परिषदेत मोठं विधान
ऑपरेशन सिंदूरनंतर Army च्या पत्रकार परिषदेत मोठं विधान
social share
google news

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने आज (7 मे) मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) पार पडलं. ज्यामध्ये मध्यरात्री 1 च्या सुमारास भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त (POK)मधील  9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले. या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरवर भारतीय लष्कर, हवाई दल आणि परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेत नेमकी माहिती दिली..

यावेळी पत्रकार परिषदेत परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्री यांच्यासह दोन महिला अधिकारी उपस्थित होत्या. यामध्ये हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह आणि भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा समावेश होत्या.

हे ही वाचा>> भारताने या ऑपरेशनला 'सिंदूर' असं नाव का दिलं? त्यामागचा अर्थ काय?

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला, 2001 मध्ये भारतावर झालेल्या संसदेवरील हल्ल्याशी संबंधित क्लिपिंग्ज, 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ला, उरी, पुलवामा आणि पहलगाम हल्ल्याशी संबंधित व्हिडिओ दाखवण्यात आले.

'पाकिस्तानमधून भारतावर आणखी हल्ले होण्याची शक्यता...'

विक्रम मिस्री म्हणाले की, 'पहलगामवरील हल्ला भ्याडपणाचा होता. जम्मू आणि काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. जातीय दंगली भडकवण्याचाही प्रयत्न झाला. ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध उघड झाले आहेत.'

हे ही वाचा>> जिथे एअर स्ट्राईक केला, ते ठिकाण का निवडलं, 'मरकज सुभान अल्लाह'मध्ये नेमकं काय? A टू Z स्टोरी

ते पुढे असंही म्हणाले की, 'पाकिस्तान जगभरातील दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे. यामुळे दहशतवाद्यांना शिक्षेपासून वाचण्यास मदत होते. तसंच आम्हाला गुप्तचर यंत्रणांकडून ही देखील माहिती मिळाली की पाकिस्तानमधून भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात...'

'आजची लष्करी कारवाई चिथावणीखोर नाही'

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री पुढे असंही म्हणाले की, 'पाकिस्तान आणि पीओकेमध्ये आजची लष्करी कारवाई अतिशय मोजून मापून, जबाबदारीने करण्यात आली होती. ती मागणी अजिबात प्रक्षोभक नव्हती.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp