Flight पकडण्यासाठी एअरपोर्टला गेली..विचित्र कपडे पाहून कर्मचाऱ्यांना बसला धक्का! 'त्या' मॉडेलनं X वर पोस्ट शेअर केली अन्...

Todays Shocking Viral News :  एका महिलेनं फ्लाईट दरम्यान विचित्र कपडे घातल्याने मोठी खळबळ उडाली. तिचे कपडे पाहून एअरलाईन्स कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आणि तिला विमानात जाण्यापासून रोखलं.

माजी प्लेबॉय मॉडेलचा दावा आहे की फ्लाइट अटेंडंटने तिला 'बटण वर' करायला सांगितले (फोटो: सारा ब्लेक गाल/एक्स)
Today Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलेनं विचित्र कपडे घातल्याने एअरपोर्टवर उडाली खळबळ

point

सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर

point

नेटकऱ्यांनी केला प्रतिक्रियांचा वर्षाव

Todays Shocking Viral News :  एका महिलेनं फ्लाईट दरम्यान विचित्र कपडे घातल्याने मोठी खळबळ उडाली. तिचे कपडे पाहून एअरलाईन्स कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आणि तिला विमानात जाण्यापासून रोखलं. त्यानंतर शर्टच बटण बंद करण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केली. त्यामुळे ती एवढी नाराज झाली की, तिने सोशल मीडियावर पोस्ट करत लोकांना प्रश्न विचारला की, तिने घातलेला आऊटफीट चुकीचा होता का?

अमेरिकन एअरलाईन्स गेल्या काही दिवसांपासून अनोख्या वादात सापडली आहे. प्ले बॉय मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सारा ब्लेक चीकने दावा केला आहे की, एअरलाईन्सच्या एका क्रू मेम्बरने फ्लाईटमध्ये बसण्यापूर्वी शर्टचा बटण लावायला सांगितलं. कारण त्या महिलेचा टॉप चुकीच्या पद्धतीने खुला होता. 34 वर्षीय सारा रविवारी रात्री अटलांटाची फ्लाईट पकडणार होती. बोर्डिंगपूर्वीच तिला क्रू मेंम्बरने रोखलं आणि शर्ट बंद करायला सांगितलं. साराचं म्हणणं आहे की, त्यांना अंदाजही नव्हता की, एअरलाईन्सचा असा ड्रेस कोड आहे, ज्यामध्ये एथलेटिक कपडे घालण्यावर बंदी आहे.

हे ही वाचा >> मराठा आरक्षण: सरकारने नवा GR केला जारी, नेमकं काय आहे नव्या जीआरमध्ये?

सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर

या घटनेबाबत तिने सोशल मीडियाच्या एक्सवर पोस्ट शेअर केली. साराने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तिने एक पिवळं फ्लॅनल शर्ट घातलं होतं. त्या शर्टच्या खाली छोटा कटऑफ टॉप होता. त्याचसोबत तिने लेगिंग्स, स्नीकर्स आणि हाय सॉक्स घातले होते. साराने आरोप केला होता की, तिला यासाठी रोखण्यात आलं, कारण तिचा बॉडी शेप आकर्षक आहे. तिचं म्हणणं आहे की, अन्य महिलांनाही असेच कपडे घातले होते, पण त्यांना कोणची काही बोललं नाही. 

या घटनेबाबत सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव करण्यात आला आहे. अनेक लोकांनी साराचं समर्थन करत म्हटलंय, हे खूप चुकीचं आहे. एकाने मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटलं, कदाचित एअर होस्टेसला जलसी झाली असेल. तर काही लोकांचं म्हणणं आहे की, एअरलाईन योग्य आहे. एका यूजरने म्हटलं, ती ओएफची मॉडेल आहे. तिला प्रमोशन करायचं आहे. अन्य एका महिला यूजरने म्हटलं, मी एका मुलीची आई आहे. माझ्या मुलीनं असे कपडे घालावे, अशी माझी अजिबात इच्छा नाही. हे दुसऱ्यांच्या प्रतिष्ठेचा हा विषय आहे. म्हणून मी एअरलाईन्सचं समर्थन करतो. 

हे ही वाचा >> कोण आहे अरुण गवळी? 17 वर्षानंतर 'डॅडी' जेलमधून बाहेर आला..दाऊदसोबत मैत्री, आमदार, शिवसेना नगरसेवकाची हत्या अन् बरंच काही...

हे वाचलं का?

    follow whatsapp