"उडी मार..." पतीने केलं प्रवृत्त अन् पत्नीने घराच्या छतावरून मारली उडी! जखमी झाल्यावर सुद्धा...
उत्तर प्रदेशात सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून एका महिलेने दुमजली घराच्या छतावरून उडी मारल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेचा 38 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बातम्या हायलाइट

सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ

छळाला कंटाळून महिलेनं घराच्या छतावरून मारली उडी

जखमी झाल्यावर सुद्धा निर्दयपणे मारहाण अन्...
Crime News: उत्तर प्रदेशात सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून एका महिलेने दुमजली घराच्या छतावरून उडी मारल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेचा 38 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित घटना अलीगढच्या गोंडा पोलीस स्टेशन हद्दीतील दौंकोली गावात घडल्याची माहिती आहे. घटनेत उडी मारणाऱ्या महिलेचं नाव अर्चना असून तिला या प्रकारानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
अर्चनाच्या पतीचं नाव सोनू असून जवळपास 6 महिन्यांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. अर्चनाचा भाऊ अंकित कुमारने सांगितलं की लग्न झाल्यानंतर अर्चनाचा पती सोनू, सासरा प्रेमपाल, सासू नेहनी देवी, दीर प्रमोद आणि जाऊ दुर्गेश देवी हुंड्यासाठी अर्चनाचा छळ करत होते. अर्चनाने तिच्या माहेरून 5 लाख रुपये रोख आणि एक बुलेट मोटरसायकल आणावी, अशी अर्चनाच्या सासरच्या मंडळींची मागणी होती.
पतीने उडी मारण्यासाठी केलं प्रवृत्त
याव्यतिरिक्त, दीर प्रमोदची अर्चनावर वाईट नजर होती आणि पीडितेने यासंबंधी तक्रार केली असता तिचा छळ करण्यात आला. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून अर्चना तिच्या दुमजली घराच्या छतावर चढली. यादरम्यान, तिचा पती सोनूने तिला उडी मारण्यास प्रवृत्त केलं आणि म्हणाला, "उडी मार." सासरच्या कुटुंबातील इतर सदस्य पाहत राहिले आणि अर्चनाला टोमणे मारत होते.
हे ही वाचा: कोण आहे अरुण गवळी? 17 वर्षानंतर 'डॅडी' जेलमधून बाहेर आला..दाऊदसोबत मैत्री, आमदार, शिवसेना नगरसेवकाची हत्या अन् बरंच काही...
जखमी झाल्यावर देखील निर्दयपणे मारहाण
अखेर, अर्चनाने घराच्या छतावरून उडी मारली. जमिनीवर पडल्यानंतर ती गंभीररित्या जखमी झाली. तरीसुद्धा, या प्रकारानंतर सोनूने तिला निर्दयपणे मारहाण करायला सुरुवात केली. एका शेजाऱ्याने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेदरम्यान अर्चनाची मुले ओरडत होती. या घटनेने सगळीकडे गोंधळ उडाला. गंभीर पद्धतीने जखमी झाल्यामुळे अर्चनाला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हे ही वाचा: 30 वर्षांची महिला गेली अल्पवयीन मुलासोबत पळून! दोन मुलांना देखील सोडलं, नंतर लैंगिक संबंध अन्...
अर्चनाची प्रकृती आता ठिक असल्याचं सांगितलं जात आहे. सीओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चनाच्या माहेरच्या लोकांच्या तक्रारीवरून पती सोनू, सासरे प्रेमपाल, सासू नेहनी देवी, मेहुणा प्रमोद आणि मेहुणी दुर्गेश देवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित घटनेचा तपास सुरू केला असून लोक याविरोधात कठोर कारवाईची मागणी करत आहेत. या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये आणि सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.