कोण आहे अरुण गवळी? 17 वर्षानंतर 'डॅडी' जेलमधून बाहेर आला..दाऊदसोबत मैत्री, आमदार, शिवसेना नगरसेवकाची हत्या अन् बरंच काही...

मुंबई तक

Arun Gawli Latest News :  कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात अरुण गवळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर सोडण्यात आलं.

ADVERTISEMENT

अरुण गवळी जामीन
Arun Gawli Latest News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चिंचपोकळी विभागाचा आमदार होता अरुण गवळी

point

अरुण गवळीला कसं मिळालं 'डॅडी' हे नाव?

point

अरुण गवळीवर चित्रपटही बनवला

Arun Gawli Latest News :  कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या चोख बंदोबस्तात अरुण गवळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर सोडण्यात आलं. त्यानंतर अरूण गवळी विमानातून मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आलीय. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी डॅडी उर्फ अरुण गवळीला जामीन मंजूर केला. मुंबईत 2007 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

वाढतं वय आणि तब्येतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने गवळीला जामीन मंजूर केला. अरुण गवळी 17 वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात होता. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणी गवळीला जन्मठेपेच्या शिक्षेसह 17 लाखांचा दंड ठोठावला होता. 

चिंचपोकळी विभागाचा आमदार होता अरुण गवळी

अरुण गवळी 2004 ते 2009 पर्यंत मुंबईच्या चिंचपोकळी विभागाचे आमदार होता. अरुण गवळीने 'अखंड महाराष्ट्र सेना'हा पक्ष सुरु केला होता. आमदारकीच्या कार्यकाळात गवळीने जामसांडेकरांची हत्या केली होती, असा आरोप होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाची सुनावणी फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे. गववळीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. 

हे ही वाचा >> Maratha Reservation: सरकारने हैदराबाद गॅझेटिअरचा GR काढला, पण त्याचा खरा अर्थ काय?

अरुण गवळीला कसं मिळालं 'डॅडी' हे नाव?

वडिलांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने अरुण गवळीने शाळा सोडल्यानंतर दूध विक्रीचा धंदा सुरु केला होता. शाळेच्या दिवसांपासूनच गवळी छोट्या-मोठ्या गँगस्टर्सच्या संपर्कात होता. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी गवळी विविध गँगमध्ये सामील झाला. तस्करी आणि खंडणी उकळणे, असे गुन्हे करत गवळीने त्याच्या क्राईम करिअरची सुरुवात केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp