बीड हादरलं! मध्यरात्री तरुण मित्रासोबत होता घाटात, नंतर काहीतरी बिनसलं? गल्लीतल्या मित्रानेच केले सपासप वार
Beed Crime : बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. एका तरुणानेच आपल्या मित्रावर वार करत संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बातम्या हायलाइट

बीड हादरून गेलं

तरुणाने मित्राचाच केला खून

नेमकं काय घडल?
Beed Crime : बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. एका तरुणानेच आपल्याच मित्रावर वार करत संपवल्याचा मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनं जिल्ह्यातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार मध्यरात्री शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडला असून या घटनेनं बीड हादरून गेलं आहे. खून करण्यात आलेल्या तरुणाचे विजय सुनील काळे (वय 25 ) असे नाव आहे.
हे ही वाचा : 'तू काळी आहेस, माझ्या लायक नाहीस...' नवऱ्यानं आणून दिली क्रिम, नंतर बायकोलाच जाळलं... भयंकर कांड समोर आलं
तरुणाने आपल्याच मित्राच्या छातीवर केले वार
घडलेल्या घटनेनुसार, विजय सुनील काळे या तरुणाच्या छातीवर मित्रानेच हत्याराने सपासप वार केले. मध्यरात्री विजय हा आपल्या मित्रांसोबत घाटात असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. त्यानंतर त्याला मध्यरात्रीच बीडच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी तपास करत त्याला मृत घोषित केले, या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तपास करण्यास सुरुवात असता, पंचनामाही करण्यात आला.
घडलेल्या घटनेमागे नेमकं कारण काय असेल हे अद्यापही समोर आलेलं नाही. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता, त्याच्याच मित्राने हा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे.
हे ही वाचा : दोन्ही भावांनी टॉवेलनं महिलेचा गळा आवळला, नंतर पतीच्या डोळ्यादेखतच पत्नीची अब्रु लुटली, नेमकं काय घडलं?
सुनीलच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर
हे प्रकरण रात्री उशिरा घडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, मात्र सकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनीच गुन्हा नोंदवून घेतला, असं पोलिसांनी सांगितलं. मृत तरुण सुनील काळे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या दुर्दैवी घटनेनं सुनीलच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोपी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.