'तू काळी आहेस, माझ्या लायक नाहीस...' नवऱ्यानं आणून दिली क्रिम, नंतर बायकोलाच जाळलं... भयंकर कांड समोर आलं

मुंबई तक

crime news : पतीच आपल्या पत्नीचा मानसिक छळ करताना दिसतो. तिला अनेकदा रंगावरून डिवचताना दिसतोय. निष्पाप पत्नीचं नाव लक्ष्मी असे आहे. तर तिच्या पतीचं नाव किसनदास आहे. किसनदास लक्ष्मीला अनेकदा काळी कुत्री म्हणून रंगावरून तिला हिणवायचा, असा गंभीर आरोप आहे.

ADVERTISEMENT

crime news (Grok)
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नी काळी म्हणून पतीनं केलं भयंकर कांड

point

अगरबत्तीनं दिलं पेटवून अन् गेला पळून

point

नेमकं काय घडलं?

crime news : प्रेमासारखं नातं या जगात कुठेच नाही. पण याच प्रेमाच्या नात्यात काही अनेकदा दुरावा देखील येण्याची शक्यता असते. त्यामागे काही कारणेही असू शकतात. उदयपूरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. तरुण आणि तरुणीने आपल्या कुटुंबियांच्या सांगण्यावरून विवाह केला होता. त्यानंतर आता तिचा पतीच आपल्या पत्नीचा मानसिक छळ करताना दिसतो. तिला अनेकदा रंगावरून डिवचताना दिसतोय. निष्पाप पत्नीचं नाव लक्ष्मी असे आहे. तर तिच्या पतीचं नाव किसनदास आहे. किसनदास लक्ष्मीला अनेकदा काळी कुत्री म्हणून रंगावरून तिला हिणवायचा, असा गंभीर आरोप आहे.

हे ही वाचा : Maratha Reservation: मराठ्यांना कुणबी दर्जा मिळाल्याने खरंच आरक्षणाचा प्रश्न संपेल? हैदराबाद गॅझेटमध्ये काय आहे नेमका आदेश?

'तू काळी आहे, तू माझ्या लायक नाहीस...' नवरा बायकोची सतत करायचा बदनामी अन्...

किसनदार आपल्या पत्नीला रंगावरून म्हणायचा की, तू काळी आहे, तू माझ्या लायक नाहीस. लक्ष्मीने दिवसरात्र अशा टोमण्यांचा सामना करावा लागत होता. पण एक दिवस किसनदास पतीने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. 24 जून 2017 रोजी तो एक चेहऱ्याला लावण्यात येणारी क्रिम घेऊन आला. त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की, ही क्रिम लावल्याने तु गोरी होशील. त्यानं आपल्या पत्नीच्या शरीरावर क्रिम लावण्यास सांगितली असता, पत्नीनं सांगितल्याप्रमाणे शरीरावर आणि चेहऱ्यावर क्रिम लावली.

पण लक्ष्मीला हे माहिती नव्हते की ती तिच्या शरीरावर जी क्रिम लावते त्या क्रिममध्ये केमिकल होते. या केमिकलमुळे चेहरा जळण्याची शक्यता असू शकते. लक्ष्मीने ते तिच्या संपूर्ण शरीरावर लावले होते, तिला काही समजण्यापूर्वीच किसनदासने जळत्या अगरबत्तीने तिला जाळलं. त्यानंतर त्यावर केमिकल टाकण्यात आले आणि लक्ष्मी ही आगीत होती. किसनदास इथवर न थांबता त्याने उरलेले केमिकल लक्ष्मीवरही ओतण्याचा प्रयत्न केला, यामुळे आग आणखी तीव्र झाली.

अगरबत्तीने पत्नीला जाळलं अन्.. 

हे भयानक कृत्य केल्याने पती किसनदार घटनास्थळावरून पळून गेला. तेव्हा मोठ्या प्रमाणात आरडाओरड करण्यात आली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण लक्ष्मी गंभीरपणे आगीत होरपळून निघाल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp