Govt Job: तरुणांनो! आता LIC मध्ये मिळवा सरकारी नोकरी... कसा आणि कधीपर्यंत कराल अर्ज?
देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिसशिपच्या 192 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

बातम्या हायलाइट

आता LIC मध्ये मिळवा सरकारी नोकरी...

कसा आणि कधीपर्यंत कराल अर्ज?
Govt Job: देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिसशिपच्या 192 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 सप्टेंबर 2025 पासून सुरू करण्यात आली असून 22 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात.
काय आहे पात्रता?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवीची डिग्री असणं अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, ज्या उमेदवारांनी आधीच अप्रेन्टिसशिप पूर्ण केली असेल, ते या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. म्हणजेच, जर तुमचं वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असेल तर तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता.
हे ही वाचा: झोपेच्या गोळ्या मिसळून कोल्ड्रिंक पाजलं अन् दोरीनेच... 2 मुलांनी सुनेसोबत मिळून केला मोठा कारनामा!
अर्जाचं शुल्क
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना अर्जाचे शुल्क भरावे लागेल. सामान्य आणि ओबीसी प्रवर्गासाठी 944 रुपये तर एससी/एसटी प्रवर्गासाठी 708 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. दुसरीकडे, पीडब्ल्यूबीडी (दिव्यांग) उमेदवारांसाठी शुल्क 472 रुपये आहे. अर्जाचं शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने जमा करता येईल.
निवड प्रक्रिया
1. लेखी परीक्षा: 1 ऑक्टोबर 2025 रोजी संबंधित परीक्षेचं आयोजन केलं जाईल.
2. डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू: लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 8 ते 14 ऑक्टोबर 2025 दरम्यान डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि मुलाखतीसाठी बोलावलं जाईल.
3. फायनल ऑफर लेटर: यामध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना 15 ते 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑफर लेटर देण्यात येतील.
हे ही वाचा: सोशल मीडियावर फोटो पाहिला अन्... भेटीत सुद्धा घडलं बरंच काही, पण खरं वय आलं समोर आणि तरुणाने केला भलताच गेम!
अर्जाची प्रक्रिया
1. सर्वप्रथम उमेदवारांना NATS पोर्टल (nats.education.gov.in) वर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल.
2. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नियुक्त पोर्टलवर अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा.
3. अर्ज सबमिट झाल्यानंतर उमेदवारांना एक ईमेल मिळेल.
4. त्यानंतर ईमेलवर दिलेल्या लिंकवर क्लिक करून, उमेदवारांना प्रशिक्षण जिल्हा पसंती आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल.
5. अर्ज पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून सुरक्षितरित्या ठेवा.