अमेरिकेतील 'ही' महिला भारतात झाली स्थायिक अन् सोडल्या 'या' 3 गोष्टी... सोशल मीडियावर होतंय प्रचंड कौतुक
क्रिस्टन फिशर मूळची अमेरिकेची असून गेल्या 4 वर्षांपासून भारतात राहत आहे. आता क्रिस्टनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील अनुभव शेअर केले आहेत.

बातम्या हायलाइट

अमेरिकेतील महिला भारतात झाली स्थायिक

भारतात आल्यानंतर सोडल्या 'या' 3 गोष्टी...

सोशल मीडियावर होतंय प्रचंड कौतुक
Viral Story: परदेशी लोक बऱ्याचदा भारतात फिरण्यासाठी येत असतात आणि नेहमीच येथील संस्कृती आणि लोकांची प्रशंसा करतात. तसेच, त्यातील असे काही परदेशी लोक आहेत ज्यांना भारत इतका आवडला की ते येथे स्थायिक झाले. आपल्या देशात असे बरेच परदेशी लोक आहेत जे जगाच्या विविध भागातून येऊन भारतात स्थायिक झाले आहेत आणि त्यांनी येथील संस्कृती स्वीकारली आहे. क्रिस्टन फिशर सुद्धा त्यापैकीच एक आहे. ही महिला मूळची अमेरिकेची असून गेल्या 4 वर्षांपासून भारतात राहत आहे. आता क्रिस्टनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील अनुभव शेअर केले आहेत.
शाकाहारी होण्याचा निर्णय
क्रिस्टनने भारतात आल्यानंतर कोणत्या गोष्टी सोडल्या, याबद्दल सांगितलं आहे. ती म्हणते की भारतात आल्यानंतर तिने मांसाहार पदार्थ सोडून पूर्णपणे शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, "मला वाटते की शाकाहारी पदार्थ स्वस्त, स्वच्छ, सोपे आणि आरोग्यदायी आहे. मला ते खूप आवडते आणि असे पदार्थ खाण्यासाठी उत्तम पर्याय असल्याचं मला वाटतं." याव्यतिरिक्त, क्रिस्टनने भारतात आल्यानंतर टॉयलेट पेपरचा वापर करणं सोडून दिल्याचं सांगितलं. अमेरिकेत तर याचा वापर अगदी सामान्य आहे. ती म्हणाली, "मला वॉटर स्प्रेचा वापर करणं जास्त व्यावहारिक वाटतं. मला जेट स्प्रे खूप आवडतो आणि मी कधीही टॉयलेट पेपरचा वापर करणार नाही."
"भारतात आल्यानंतर बरीच आव्हाने..."
क्रिस्टन पुढे म्हणाली की भारतात आल्यानंतर तिने तिच्या असुरक्षिततेच्या भावना मागे सोडल्या. तसेच, या बदलासोबत नवीन भाषा शिकणे, वेगळ्या संस्कृतीशी जुळवून घेणे आणि नवीन मित्र बनवणे यासारखी आव्हाने आली असल्याचं तिने कबूल केलं. ती म्हणाली, "अमेरिकन संस्कृतीच्या अनेक पैलूंबद्दल मला असुरक्षितता होती, ज्याची मला आता काळजी नाही. मला आता शाळेत माझ्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल सतत भीती बाळगावी लागत नाही." क्रिस्टन तिच्या भारतातल्या वास्तव्याबद्दल म्हणते, "मला आता खात्री आहे की मी जिथे असायला हवी होती तिथे आहे आणि यामुळे माझे कुटुंब येथे चांगल्या स्थितीत आहे."
हे ही वाचा: लग्नानंतर 6 महिने नव्हते शारीरिक संबंध! तरीही राहिली गरोदर, पती संतापला अन्... प्रेमविवाह होऊन सुद्धा काय घडलं?
क्रिस्टनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि तो पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिले आहे की, "शाकाहारी असणे हा एक आदरणीय आणि अतिशय चांगला निर्णय आहे", तर दुसऱ्याने लिहिले आहे की, "डबाबंद अन्न सुद्धा! भारतात सर्व काही ताजे मिळते."