झोपेच्या गोळ्या मिसळून कोल्ड्रिंक पाजलं अन् दोरीनेच... 2 मुलांनी सुनेसोबत मिळून केला मोठा कारनामा!

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये 2 मुलांनी मिळून आपल्या वडिलांचीच हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. या गुन्ह्यात सुनेनंही आरोपी मुलांना साथ दिली.

झोपेच्या गोळ्या मिसळून कोल्ड्रिंक पाजलं अन् दोरीनेच...
झोपेच्या गोळ्या मिसळून कोल्ड्रिंक पाजलं अन् दोरीनेच...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

2 मुलांनी सुनेसोबत मिळून केली वडिलांची हत्या..

point

हत्येमागचं नेमकं कारण आलं समोर

Murder Case: उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 2 मुलांनी मिळून आपल्या वडिलांचीच हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. या गुन्ह्यात सुनेनंही आरोपी मुलांना साथ दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून लवकरच त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती आहे.

काय आहे नेमकी घटना? 

ही घटना मेरठ जिल्ह्यातील जानी पोलीस स्टेशन परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. येथे दोन मुलांनी सुनेसह त्यांच्या वडिलांची हत्या केल्याची बातमी समोर आली. आरोपींना आधी वडिलांना झोपेच्या गोळ्या मिसळलेलं कोल्ड्रिंक प्यायला दिलं. नंतर पीडित वडील पडताच मुलांनी दोरीने गळा दाबून त्यांचा खून केला. संशय येऊ नये म्हणून हत्येनंतर आरोपी आपापल्या घरी जाऊन झोपी गेले. 

हत्येमागचं नेमकं कारण आलं समोर

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीचा हिस्सा मिळवण्यासाठी आणि कौटुंबिक वादातून दोन्ही मुलांनी मिळून ही हत्या केली. मंगळवारी (2 ऑगस्ट) पोलिसांनी वडिलांच्या हत्येप्रकरणी दोन मुलं आणि एका सुनेसह तीन आरोपींना अटक केली आहे.

हे ही वाचा: सोशल मीडियावर फोटो पाहिला अन्... भेटीत सुद्धा घडलं बरंच काही, पण खरं वय आलं समोर आणि तरुणाने केला भलताच गेम!

पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे, सिसोला बुजुर्ग गावातील रहिवासी गुलफाम यांची 30 ऑगस्टच्या रात्री त्यांची दोन मुले अरसलान आणि फरदीन आणि सून शहजादी यांनी हत्या केली. मृताची पत्नी गुलिस्ता हिच्या तक्रारीवरून जानी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

हे ही वाचा: बापरे! मुलीच्या मागे लागला साप अन् महिन्याभरात तब्बल 9 वेळा डसला... नेमकी घटना काय?

देशात प्रॉपर्टीच्या लोभापायी मुलांनीच त्यांच्या आई-वडिलांनी हत्या केल्याच्या बऱ्याच घटना पाहायला मिळतात. पैसे आणि प्रॉपर्टीच्या वादातून मुलं पालकांच्या जीवावर उठतात. मात्र, घटना आता समाजासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत आणि यातून माणूस इतका असंवेदनशील कसा असू शकतो? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp