शरीरसंबंध ठेवण्यास बायकोचा नकार, नवऱ्यानं बायकोला पाहिलं परपुरुषासोबत, बायकोनंच...

Extramarital affairs : बायकोनेच आपल्या नवऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. हत्येमागेचं कारण ऐकून तुम्हालाही हादराच बसेल.

Extramarital affairs
Extramarital affairs
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बायकोनेच आपल्या नवऱ्याची हत्या केली

point

धक्कादायक कारण आलं समोर

point

नेमकं काय घडलं?

Extramarital affairs : बायकोनेच आपल्या नवऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. हत्येमागेचं कारण ऐकून तुम्हालाही हादराच बसेल. नवरा आपल्या बायकोसोबत शरीरसंबंध ठेवू इच्छित होता. पण पत्नीनं नकार दिला आणि नवऱ्याची हत्या केली आहे. संबंधित प्रकरणाची माहिती पोलीस चौकशीतूनच समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील मधुसूदनगडच्या बंजारी बारी येथील आहे. मृत पतीचं नाव कैलाश बंजारा असे आहे. तर पत्नीचं नाव संपो बाई असे आहे.

हे ही वाचा : 'दुपारी 3 वाजेपर्यंत रस्ते रिकामे करा अन्यथा...' हायकोर्टाचा सरकारला आदेश, आता उरला अवघा अर्धा तास.. मुंबईत काय सुरू?

सुरूवातीला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, पतीचा झालेल्या मृत्यूचं सामान्य कारण असेल असं पोलिसांना वाटलं होतं. पण एकूण तपासातून खरं कारण समोर आलं. नवरा बऱ्याच काळापासून आजारी होता. अंत्यसंस्कार करताना मृतदेहाच्या मानेवर खूणा दिसल्यानं गावकऱ्यांना हत्येचा संशय आला.

पतीच्या हत्येचा कबुलीनामा

संबंधित प्रकरणात संशय बळावला गेल्यानंतर या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी बंजारा समाजाची एक पंचायत बोलावण्यात आली. त्यानंतर तिथे पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याचा कबुलीनामा दिला. पण, नेमकी हत्या का केली हे कारण तिनं पंचायतीत सांगितलं नाही. नंतर, पोलिसांनी काटेकोरपणे चौकशी करत हे प्रकरण समोर आलं.

तिचा पती कैलाश बऱ्याच काळापासून आजारी होता. या आजारादरम्यान, ती गावातील जमीनदार प्रदीप भार्गव यांच्या संपर्कात आली आणि त्यानंतर त्या दोघांचेही विवाहबाह्यसंबंध सुरु झाले. संबंधित प्रकरणाची माहिती कैलासला समजताच तो आपल्या बायकोवर संतापला आणि तिला अनेकदा मारहाणही करण्यात आली होती.

जेव्हा पत्नीनं पतीची हत्या केली त्याच दिवशी कैलासने त्याच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पत्नीने सांगितलं की, ती सध्या आजारी आहे. म्हणून हे योग्य नाही. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरातच कैलासने पत्नीला मारहाण केली.

हे ही वाचा : वहिनीला आवडायचा दीर, पतीला बंद केलं एका खोलीत, नंतर दीरासोबतच... भयंकर कांड

दोरीने गळाच आवळला अन् ...

दोघांमधील वाद विकोपाला गेला असता, तेव्हा पती कैलास घरातून बाहेर पडला असता, दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. तेव्हा पत्नीने दोरीने कैलासा गळा आवळला. तेव्हा पती कैलासला गुदमरल्यासारखं झालं आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. पतीच्या हत्येनंतर, घरमालक प्रदीप भार्ग यांना फोन करून संपूर्ण घटना सांगितली. संबंधित प्रकार कोणालाही सांगू नका असे सांगितलं. पण, अंत्यसंस्काराच्या वेळी मानेवरील खुणा पाहताच संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

हे वाचलं का?

    follow whatsapp