सोशल मीडियावर फोटो पाहिला अन्... भेटीत सुद्धा घडलं बरंच काही, पण खरं वय आलं समोर आणि तरुणाने केला भलताच गेम!
उत्तर प्रदेशातील मैनपुरीचा रहिवासी असलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने त्याच्या 52 वर्षीय प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

बातम्या हायलाइट

सोशल मीडियावर जुळले सूत

पण खरं वय आलं समोर आणि तरुणाने केला भलताच गेम!
Crime News: सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीमुळे धक्कादायक घटना घडत असल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळतं. उत्तर प्रदेशातून अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथील मैनपुरीचा रहिवासी असलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने त्याच्या 52 वर्षीय प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. लग्नासाठी दबाव आणि महिलेचं खरं वय उघडकीस येणं, हेच हत्येमागचं कारण असल्याचं समोर आलं.
सोशल मीडियावर झाली मैत्री...
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, फर्रुखाबाद येथे राहणाऱ्या राणी देवीचं (52) एका शेतकऱ्यासोबत लग्न झालं होतं. त्यांना चार मुलं सुद्धा होती. मात्र, जवळपास 18 महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून राणी देवीची मैनपुरीचा रहिवासी असलेल्या एका अरुण राजपूत (25) नावाच्या ट्रक ड्रायव्हरसोबत ओळख झाली. कालांतराने त्या दोघांमध्ये बोलणं वाढत गेलं आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
स्वत:ला तरुण असल्याचं दाखवलं
खरंतर, राणी देवीने सोशल मीडियावर अरुणसोबत मैत्री करताना तिचं वय लपवलं असल्याचं समोर आलं. तिने फोटो फिल्टरचा वापर करून स्वत:ला तरुण असल्याचं दाखवलं. अरुणला सुरुवातील संबंधित महिलेच्या वयाबद्दल काहीच कल्पना नव्हती. पण भेटीदरम्यान हळूहळू सत्य बाहेर आलं. मात्र, तरी देखील त्यांच्यातील प्रेमसंबंध सुरूच राहिले.
पैसे आणि लग्नावरून भांडण
या काळात अरुणने राणी देवीकडून सुमारे दीड लाख रुपये घेतले. नंतर, जेव्हा महिलेने पैसे परत मागण्यास सुरुवात केली आणि त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणला तेव्हा नात्यात मतभेद वाढू लागले. यानंतर, 10 ऑगस्ट रोजी अरुणने राणी देवीला मैनपुरीच्या एका निर्जनस्थळी बोलावलं. तिथे दोघांमध्ये पैसे आणि लग्नावरून भांडण झालं. पोलिसांच्या माहितीनुसार, रागाच्या भरात अरुणने तिच्याच ओढणीने राणी देवीचा गळा दाबला आणि मृतदेह फेकून फरार झाला.
हे ही वाचा: बापरे! मुलीच्या मागे लागला साप अन् महिन्याभरात तब्बल 9 वेळा डसला... नेमकी घटना काय?
मृतदेह ताब्यात घेतला आणि ओळख पटली
दुसऱ्याच दिवशी, पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, त्यावेळी तिची ओळख पटू शकली नाही. त्यानंर, पोलिसांनी मृत महिलेचे फोटो आणि तपशील जवळील जिल्ह्यांच्या पोलीस ठाण्यात पाठवले आणि माहिती गोळा केली. 30 ऑगस्ट रोजी फर्रुखाबादमध्ये दाखल केलेल्या बेपत्ता महिलेच्या तक्रारीची माहिती मिळाली आणि त्यानंतर कुटुंबियांनी तो मृतदेह राणी देवीचा असल्याचं सांगितलं.
हे ही वाचा: 30 वर्षांची महिला गेली अल्पवयीन मुलासोबत पळून! दोन मुलांना देखील सोडलं, नंतर लैंगिक संबंध अन्...
पोलिसांनी केली कारवाई
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपीला अटक केली असून चौकशीदरम्यान, त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. आरोपीने पोलिसांना सांगितलं की तिचं खरं वय उघडकीस येणं, लग्नाचा दबाव आणि पैसे परत करण्याची मागणी यामुळे त्याला गुन्हा करण्यास प्रवृत्त केलं गेलं.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देखील महिलेचा गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 103 (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.