लडकी का चक्कार बाबू भैय्या! तरुणाकडून दिवसाढवळ्या गोळीबार, हादरून टाकणारं प्रेमप्रकरण
Crime News : प्रेमप्रकरणातून एका तरुणावर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीचा ब्रेकअप झाल्यानंतरही ती आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलत असल्याने गोळीबार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

बातम्या हायलाइट

प्रेमप्रकरणातून एक्स बॉयफ्रेंडवर गोळीबार

नेमकं काय घडलं?
Crime News : प्रेमप्रकरणातून एका तरुणावर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीचा ब्रेकअप झाल्यानंतरही ती आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलत होती. यामुळे तिचा नवा बॉयफ्रेंडला अजिबातच आवडलं नाही. त्याने प्रियेसीला अनेकदा समजावूनही सांगितलं, पण तिनं आपल्या बॉयफ्रेंडचं कणभरही ऐकलं नाही. हे सर्व पाहून तिच्या बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडवर गोळीबार केला, ही घटना पटणातील असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : 'तू काळी आहेस, माझ्या लायक नाहीस...' नवऱ्यानं आणून दिली क्रिम, नंतर बायकोलाच जाळलं... भयंकर कांड समोर आलं
नेमकं काय घडलं?
जखमी झालेल्या तरुणीवर एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, गौतमवर गोळीबार करणारा आरोपी अभिषेक पोलिसांच्या ताब्यात आहे. संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास केला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, ज्या दिवशी हा धक्कादायक प्रकार समोर आला तेव्हा गौतमने अभिषेकला फोनद्वारे संपर्क केला होता.
एक्स बॉयफ्रेंडच्या मानेवर गोळीबार
दरम्यान, त्याचा अभिषेकचा त्याच्या गर्लफ्रेंडशी वाद झाला. तेव्हा दोघांमध्ये शिवीगाळही झाली होती, त्यानंतर अभिषेक त्याच्या प्रेयसीसह घटनास्थळावरून निघून गेला. पण अभिषेक आपल्या गर्लफ्रेंडला सोडून बंदूक घेऊन परतला आणि नंतर गौतमच्या मानेवर गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर तो पळून गेला.
हे ही वाचा : शनी राशीत वर्षातील शेवटचं ग्रहण देशात दिसणार, काही राशीतील लोकांना आर्थिक लाभ मिळणार, आजचं राशीभविष्य काय?
या प्रकरणात सांगितलं जाते की, घटनेत वापण्यात आलेली दुचाकी आणि इतर शस्त्रे पोलीसांनी जप्त केली आहेत. अभिषेकचे इतर साथीदार हे फरार झाले आहेत. तर अभिषेकच्या पोलिसांनी अरवल येथून मुसक्या आवळल्या आहेत. गुन्ह्यात समावेश असलेल्या इतर साथीदारांचा शोध सध्या सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. छाप्यादरम्यान अभिषेकच्या घरातून बंदुकीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जखमी गौतमवर उपचार सुरु आहे.