'मुंबईत मोर्चाला जायला पैेसे नाहीत मी घरीच...' नैराश्यात येऊन आणखी एका मराठा तरुणानं औषध पिऊन उचललं टोकाचं पाऊल

Maratha Protestor Suicide : बीड जिल्ह्यातील आहेरगाव येथील एका मराठा बांधवाने औषध पिऊन आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव भरत खरसाडे असे आहे.

maratha protestor
maratha protestor
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 1 सप्टेंबर रोजी चौथा दिवस

point

मराठा बांधवाने उचललं टोकाचं पाऊल

point

औषध घेऊन केली आत्महत्या

Maratha Protestor Suicide : मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 1 सप्टेंबर रोजी चौथा दिवस आहे. मराठा आंदोलकांनी आरक्षणाची मागणी कायम ठेवली आहे. आरक्षण मिळेल या आशेनं अनेक मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत, पण अद्यापही सरकारने कसलीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील आहेरगाव येथील एका मराठा बांधवाने औषध पिऊन आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव भरत खरसाडे असे आहे.

हे ही वाचा : अमेरिकेतील 'ही' महिला भारतात झाली स्थायिक अन् सोडल्या 'या' 3 गोष्टी... सोशल मीडियावर होतंय प्रचंड कौतुक

'आरक्षणाचा मुद्दा चालढकलीवर...'

भरत खरसाडे या आत्महत्या केलेल्या तरुणाला मुंबई येथील मोर्चात सामिल व्हायचे होते. पण मोर्चासाठी मुंबईला जाण्यासाठी पैसे नाहीत. तसेच घरातील आर्थिक परिस्थितीही नाजूक असल्याने वजिलांनी पैसेच दिले नाहीत. हे सरकार जाणून बुजून आरक्षणाचा मुद्दा चालढकल करत आहे. मी घरी कसं काय बसू असे म्हणत तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे.

मुंबईला जाण्यास पैसे नसल्यानं नैराश्य अन् टोकाचं पाऊल 

यानंतर तरुणाला बीडच्या लोटस खासगी रुग्णालयात गेली चार दिवस उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मराठा आरक्षणासाठी आणखी एकाचा बळी गेला अशी नातेवाईकांनी खंत व्यक्त केली आहे. प्रत्.येक आंदोन मोर्चे उपोषणात भरत खरसाडे हात तरुण सहभागी असयाचा, पण मुंबईला जाण्यासाठी पैसे नसल्याने तरुण नैराश्यात आला आणि त्यानं टोकाचं पाऊल उचललं. सरकारने याचा तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी आता त्यांच्या कुटुंबांमधून आणि नातेवाईकांनी केली आहे.

हे ही वाचा : बीड हादरलं! परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर आई-वडील करत होते आराम, 5 वर्षांच्या मुलीला नेलं अज्ञातस्थळी अन्...

सरकार आणखी किती बळी घेणार आहेत? असा प्रश्न कुटुंबियांनी केला. भरत खरसाडे हा तरुण प्रत्येक आंदोलनात सहभागी असायचा. त्याचे मोर्चातील काही फोटो समोर आले होते. या दुर्दैवी घटनेनं एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. सरकारने तात्काळ आरक्षण द्यावं अशी कुटुंबियांनी मागणी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp