Maharashtra Weather: रायगडसह कोकणात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Weather Today: भारतीय हवामान खात्याने (IMD) 2 सप्टेंबर रोजी राज्यातील हवामानाबाबतचा ताजा अंदाज जाहीर केला आहे. राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, हवामान विभागाने काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

maharashtra weather (grok)
maharashtra weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील हवामानाबाबतचा ताजा अंदाज

point

2 सप्टेंबर रोजी हवामानाचा एकूण अंदाज जाहीर

Maharashtra Weather : भारतीय हवामान खात्याने (IMD) 2 सप्टेंबर रोजी राज्यातील हवामानाबाबतचा ताजा अंदाज जाहीर केला आहे. राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, हवामान विभागाने काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर अशातच राज्यातील हवामानाबाबतची एकूण परिस्थिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे ती जाणून घेऊयात.

हे ही वाचा : मनसेकडून आंदोलकांना वानखेडे स्टेडियम देण्याची मागणी, नंतर राज ठाकरेंच्या टीकेवरही... काय म्हणाले बाळा नांदगांवकर?

कोकण विभाग : 

हवामान विभागाने राज्यातील कोकण भागातील पालघर आणि रायगडसह कोकण किनारपट्टीवर 2 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज जारी केला आहे. तर काही ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांसह पावसाची हवामान विभागाने शक्यता जारी केली आहे. हवामान विभागाने कोकणभागला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच कोकण भागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

पश्चिम महाराष्ट्र : 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथ्यावर हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

मराठवाडा आणि विदर्भ : 

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि परभणी यासह विदर्भातील नागपूर, अमरावती आणि वर्धा या भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, परंतु अतिमुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली येथे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हे ही वाचा : मुंबईतील डोंगरी परिसरात तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण, नंतर दोरीने गळा आवळत केली हत्या, सीसीटीव्ही पाहताच...

उत्तर महाराष्ट्र : 

नाशिक, जळगाव आणि धुळे येथे हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे. तापमान 25 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, आणि आर्द्रता जास्त असेल. नाशिक, जळगाव, धुळे, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेडमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp