मध्यरात्री पतीच्या रुमची गुपचूप लावली कडी! वहिनी दीराच्या रुममध्ये गेली अन् सर्वात भयंकर कांड केलं, घडलं तरी काय?
Extra Marital Affair Shocking News : बिहारच्या पटना येथे फुलवारीशरीफ या ठिकाणी एका तरुणाची हत्या करण्यात आलीय. तरुणाला रात्रीच्या वेळी त्याच्या वहिनीने मारलं आणि ती फरार झाली.

बातम्या हायलाइट

दीरासोबत होतं वहिनीचं अफेअर

त्या रात्री घडली सर्वात भयंकर घटना

पोलिसांकडून आरोपीचा शो
Extra Marital Affair Shocking News : बिहारच्या पटना येथे फुलवारीशरीफ या ठिकाणी एका तरुणाची हत्या करण्यात आलीय. तरुणाला रात्रीच्या वेळी त्याच्या वहिनीने मारलं आणि ती फरार झाली. तरुणाची मोठी वहिनी जेव्हा दीराच्या रुममध्ये गेली, तेव्हा तिने आरडाओरडा केला. त्यानंतर तिचा आरडाओरडा ऐकून बाकी लोकंही तिथे आले. त्यानंतर उघडकीस आलं की, त्याच्या दोन नंबरच्या वहिनीनं त्याची हत्या केली आणि घटनेनंतर ती फरार झाली. रिझवान कुरेशी (24) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
दरम्यान, कुटुंबियांनी याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून आरोपी महिलेचा शोध सुरु आहे. ही भयंकर घटना भुसौला दानापूर परिसरात घडली. शनिवारच्या रात्री कौंटुबिक वादविवादामुळे रिझवान कुरेशीची हत्या करण्यात आली. कुटुंबियांनी म्हटलंय की, रिझवान त्याच्या रुममध्ये झोपला होता. त्याचदरम्यान त्याचा भाऊ शाहबाज कुरेशीची पत्नी शबनमने धारदार शस्त्राने रिझवानवर वार केले आणि त्याची हत्या केली.
हे ही वाचा >> Maratha Reservation: हायकोर्टाचे आदेश आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'ते' विधान, आता नेमकं घडणार तरी काय?
सकाळी मोठी वहिनी दीराला जागं करायला गेली होती. पण रुममध्ये काहीच आवाज आला नाही. तेव्हा तिने लाईट लावून पाहिलं तर रिझवान रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. त्यानंतर तिने आरडाओरडा केला आणि नंतर कुटुंबियांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर फुलवारीशरीफ पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला.
दीरासोबत होतं वहिनीचं अफेअर
कुटुंबियांनी सांगितलं की, रिझवानचं लग्न एक वर्षांपूर्वी झालं होतं. त्याची पत्नी माहेरी गेली होती. रिझवान जेव्हा सिंगल होता, तेव्हा त्याचं शबनमसोबत अफेअर होतं. जेव्हा त्याचं लग्न ठरलं, तेव्हा दोघांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण त्यांना रोखलं गेलं. लग्नानंतर रिझवान त्याच्या पत्नीवर प्रेम करत होता. पण शबनमला हे सहन झालं नाही. तिला रिझवानसोबत राहायचं होतं. जेव्हा शबनमने रिझवानसोबत राहण्याची जिद्द केली, तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर जेव्हा रिझवानची पत्नी माहेरी गेली, तेव्हा शबमनने रिझवानला मारलं. दीराचा खून करण्याआधी तिने तिच्या पतीला रुममध्ये बंद केलं होतं.