प्रेम, लग्न आणि मर्डर! लव्ह मॅरेज केलेल्या पत्नीवर घेतला अनैतिक संबंधांचा संशय, नवऱ्याने बायकोचा कैचीने केला खून

Husband Killed Wife : बिहारच्या दरभंगा येथे धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. येथे राहणाऱ्या एका पतीने कैचीने हल्ला करून पत्नीची निर्घृण हत्या केली. सुमित्रा देवी (27) असं मृत महिलेचं नाव आहे.

'त्या' कारणामुळे केली पत्नीची हत्या, नंतर मृतदेह जमिनीत पुरला
Husband Killed Wife
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीला पत्नीचं अफेअर असल्याचा संशय आला

point

आरोपी दिल्लीहून परत आला अन् त्याने केली पत्नीची हत्या

point

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

Husband Killed Wife : बिहारच्या दरभंगा येथे धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली. येथे राहणाऱ्या एका पतीने कैचीने हल्ला करून पत्नीची निर्घृण हत्या केली. सुमित्रा देवी (27) असं मृत महिलेचं नाव आहे. लालबाबू असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून या हत्याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 

ही धक्कादायक घटना दरभंगा जिल्ह्यातील बघौनी गावात घडली. रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास मोठी खळबळ उडाली होती. एका पतीने कैचीने हल्ला करत त्याच्या पत्नीची हत्या केली. आरोपी लालबाबू दासने पत्नीवर अफेअरचा संशय घेतला होता. या संशयामुळे त्याने पत्नी सुमित्रा देवीचा खून केला.

पत्नीचं अफेअर असल्याचा संशय अन् पतीनं केलं भयंकर कृत्य

आरोपी लालबाबू दासने चार वर्षांपूर्वी बिरौल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तरवाडा गावातील सुमित्रा देवीसोबत लग्न केलं होतं. दाम्पत्याला 3 वर्षांची मुलगी आहे. श्रृष्टी कुमारी असं तिचं नाव आहे. लालबाबू दिल्लीला राहायचा. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नीच्या अफेअरबाबत खबर काढली होती. त्यानंतर तो दिल्लीच्या घरी परत आला होता आणि त्यानंतर त्याने हत्येचा गुन्हा केला.

हे ही वाचा >> 'मुंबईत मोर्चाला जायला पैेसे नाहीत मी घरीच...' नैराश्यात येऊन आणखी एका मराठा तरुणानं औषध पिऊन उचललं टोकाचं पाऊल

आरोपी दिल्लीहून परत आला अन् त्याने केली पत्नीची हत्या 

पोलिसांनी म्हटलं की, काही दिवसांपूर्वी पत्नी पतीचा घर सोडून 15 दिवस तिच्या प्रियकरासोबत राहत होती. त्यानंतर पत्नी घरी आल्याचं पती लालबाबू दासला कळलं आणि तो दिल्लीहून घरी परत आला. त्यानंतर त्याने पत्नीसोबत वादविवाद केला आणि तिच्यावर कैचीने हल्ला करून तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच, एसडीपीओ आशुतोष कुमार पोलीस टीमसोबत घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला अटक केली. तसच महिलेच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमार्टमसाठी पाठवला. दरम्यान, पोलिसांकडून या हत्या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 

हे ही वाचा >> बीड हादरलं! परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर आई-वडील करत होते आराम, 5 वर्षांच्या मुलीला नेलं अज्ञातस्थळी अन् केलं लैंगिक शोषण

हे वाचलं का?

    follow whatsapp