मुंबईतील डोंगरी परिसरात तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण, नंतर दोरीने गळा आवळत केली हत्या, सीसीटीव्ही पाहताच...
Mumbai Crime : मुंबईतील डोंगरी परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका 26 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

बातम्या हायलाइट

मुंबईतील डोंगरी परिसरात खून

26 वर्षीय तरुणाची हत्या

नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : मुंबईतील डोंगरी परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका 26 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणाचे नाव अराफात मेहबूब खान असे नाव आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी अराफतचा गळा दाबून हत्या केली. या घटनेनं परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिकांनी पोलिसांकडे आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा : मनसेकडून आंदोलकांना वानखेडे स्टेडियम देण्याची मागणी, नंतर राज ठाकरेंच्या टीकेवरही... काय म्हणाले बाळा नांदगांवकर?
नेमकं काय घडलं?
अराफत मेहबूब खान या तरुणाची मुंबईतील डोंगरी परिसरात हत्या करण्यात आली. मेहबूब खानचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. संबंधित घटनेची माहिती घटनास्थळी उपस्थितांनी पोलिसांना दिली असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दोरीने गळा आवळून केली हत्या
तपासातून समोर आलं की, अरफातवर आरोपींनी आधी हल्ला केला. त्यानंतर जाड दोरीसारख्या वस्तूने अरफातचा गळा आवळण्यात आला होता. या हत्येमागे कोण होते? हत्या करण्यामागे नेमका काय हेतू होता? याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्यापही समोर आली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा खोलवर तपास करण्यास सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला सीसीटीव्ही तपासले आणि पुढील शोध सुरू केला.
घटनास्थळावरील असलेल्या दुकानांमधील कॅमेरे, रस्त्यांवरील आणि इमारतींना बसवण्यात आलेले कॅमेरे तपासण्यात आले होते. सध्या पोलीस शवविच्छेदन केलेल्या अहवालाची वाट बघत आहेत. यामुळे मृत्यूचं खरं कारण अद्यापही समोर आलं नाही. तसेच, तांत्रिक तपासणी आणि मोबाईल रेकॉर्डरच्या आधारे, पोलीस लवकरच हत्येचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे ही वाचा : Maratha Reservation: 'मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे घडतं आहे', सदावर्तेंचा हायकोर्टात खळबजनक दावा
संबंधित घटनेची माहिती कळताच परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. संतप्त झालेल्या लोकांनी पोलिसांकडून तात्काळ कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की, ही हत्या वैमनस्यातून झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.