मनसेकडून आंदोलकांना वानखेडे स्टेडियम देण्याची मागणी, नंतर राज ठाकरेंच्या टीकेवरही... काय म्हणाले बाळा नांदगांवकर?

मुंबई तक

Maratha Reservation: राज ठाकरे यांनी आरक्षणावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलं होतं. त्यावर मनोज जरांगेंनी राज ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला होता. आता मनसे नेते बाळा नांदगांवकरांनी टीकेला प्रत्युत्तर दिलं. तसेच सरकारने लवकरात लवकर आंदोलनावर तोडगा काढावा. आंदोलकांसाठी आझाद मैदान कमी पडू लागलं असून वानखेडे स्टेडियम वापरण्यासाठी द्यावं, असे ते म्हणाले.

ADVERTISEMENT

MNS
MNS
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंवरील 'त्या' टीकेला नांदगांवकरांचं प्रत्युत्तर

point

मनसेकडून आंदोलकांना वानखेडे स्टेडियमची मागणी

Maratha Reservation : मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील हे राजकीय नेत्यांवर टीका टिप्पणी करताहेत . याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलं होतं. त्यावर मनोज जरांगेंनी राज ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला होता. आता मनसे नेते बाळा नांदगांवकरांनी टीकेला प्रत्युत्तर दिलं. तसेच सरकारने लवकरात लवकर आंदोलनावर तोडगा काढावा. आंदोलकांसाठी आझाद मैदान कमी पडू लागलं असून वानखेडे स्टेडियम वापरण्यासाठी द्यावं, असे ते म्हणाले.

हे ही वाचा : 'मुंबईत मोर्चाला जायला पैेसे नाहीत मी घरीच...' नैराश्यात येऊन आणखी एका मराठा तरुणानं औषध पिऊन उचललं टोकाचं पाऊल

राज ठाकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर 

तसेच त्यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे. नांदगांवकर म्हणाले की, राज ठाकरेंचा स्वभाव हा मला माहिती आहे, ते स्पष्टपणे बोलतात, त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असे काहीही नसते, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती.

पुढे ते म्हणाले की, अमित ठाकरेंचं म्हणणं असं आहे की, हे लोक आपलेच आहेत, त्यांचा लढा सुरु आहे, त्यांना मदत करा, त्यांना कसलीही मदत कमी पडू देऊ नये, असे अमित ठाकरेंचं म्हणणं आहे. सरकारला माझी विनंती आहे की, आंदोलकांना आझाद मैदानाची जागा कमी पडत आहे, त्यांना वानखेडे स्टेडियम द्या, ते बरं होईल. त्यांना एकाच ठिकाणी जागा मिळेल, असे बाळा नांदगांवकर म्हणालेत.

'गणपतीत कोणालाही कसलीही अडचण व्हायला नको'

आंदोलकांना काहीही कमी पडलं जाऊ नये अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. मी जरांगे पाटलांना तसेच आंदोलकांना विनंती करतो की कायदा आणि सुव्यवस्था बिघडली जाता कमा नये. कारण गणपतीत कोणालाही कसलीही अडचण व्हायला नको. सरकार कमी पडतंय असं नाही, तेही काम करतच आहे, असे बाळा नांदगांवकर म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp