‘मॅगी’साठी प्रसिद्ध असलेल्या Nestle कंपनीच्या बॉसचे जुनिअरसोबत रिलेशनशिप! CEO ची नोकरी गेली अन्...

फूड कंपनी नेस्ले (Nestle) ने सोमवारी लॉरेंट फ्रीक्स यांना तात्काळ सीईओ (CEO) पदावरून काढून टाकलं. त्यांच्यावर त्यांच्या जुनिअर म्हणजेच खालच्या पदावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे.

‘मॅगी’साठी प्रसिद्ध असलेल्या Nestle कंपनीच्या बॉसचे जुनिअरसोबत रिलेशनशिप!
‘मॅगी’साठी प्रसिद्ध असलेल्या Nestle कंपनीच्या बॉसचे जुनिअरसोबत रिलेशनशिप!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

Nestle कंपनीच्या बॉसचे जुनिअरसोबत रिलेशनशिप!

point

Nestle कंपनीच्या CEO ची नोकरी गेली

मॅगी आणि किटकॅट चॉकलेट बनवणारी स्विस फूड कंपनी नेस्ले (Nestle) ने सोमवारी लॉरेंट फ्रीक्स यांना तात्काळ सीईओ (CEO) पदावरून काढून टाकलं. त्यांच्यावर त्यांच्या जुनिअर म्हणजेच खालच्या पदावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे.

फ्रीक्स यांना त्यांच्या पदावरून काढून टाकलं 

नेस्प्रेसो कॉफीसाठी प्रसिद्ध असलेल्या या मल्टीनॅशनल कंपनीने सांगितलं की, चौकशीनंतर CEO म्हणून कार्यरत असणाऱ्या फ्रीक्स यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं. आता नेस्प्रेसोचे सीईओ फिलिप नवरातिल यांना त्यांच्या सहकारी बोर्ड सदस्यांनी नेस्लेचे सीईओ म्हणून नियुक्त केलं आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे की, "लॉरेंट फ्रीक्स हे थेट अधीनस्थ म्हणजेच डॉयरेक्ट सबऑर्डिनेट पदावर काम करणाऱ्या व्यक्तीसोबत अघोषित प्रेमसंबंधात असल्याचं आढळून आल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे, ज्यामुळे नेस्लेच्या व्यवसाय आचारसंहितेचे उल्लंघन झालं आहे."

कंपनीचे अध्यक्ष पॉल बुल्के आणि प्रमुख स्वतंत्र संचालक पाब्लो इस्ला यांच्या देखरेखीखाली बाह्य वकिलांच्या मदतीने चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे बोर्डाने म्हटलं आहे. "हा एक आवश्यक निर्णय होता. नेस्लेची मूल्ये आणि प्रशासन हे आमच्या कंपनीचे मजबूत पाया आहेत. मी लॉरेंटच्या वर्षानुवर्षे केलेल्या सेवेबद्दल त्यांचे आभार मानतो," असे बुल्के यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

हे ही वाचा: '...तोवर आझाद मैदान सोडणार नाही', मनोज जरांगे ठाम… CSMT बाहेर नेमकं काय घडतंय?

फ्रीक्स यांचा CEO होण्यापर्यंतचा प्रवास  

फ्रीक्स 1986 साली फ्रान्स येथे नेस्लेमध्ये सामील झाले. त्यांनी 2014 पर्यंत कंपनीचे युरोपियन कामकाज चालवले आणि 2008 मध्ये सुरू झालेल्या सबप्राइम आणि युरो संकटादरम्यान, कंपनीचं नेतृत्व केलं. सीईओ म्हणून बढती मिळण्यापूर्वी त्यांनी लॅटिन अमेरिका विभागाचं नेतृत्व केलं. सप्टेंबर 2024 मध्ये अचानक झालेल्या बदलामुळे फ्रीक्स हे CEO पदावर आले. कंपनीच्या अन्न आणि घरगुती वस्तूंवर ग्राहक कमी खर्च करत होते आणि सीईओ म्हणून, याकडे विशेष लक्ष देण्याचं काम त्यांना सोपवण्यात आलं होतं.

हे ही वाचा: मुलाला बर्थडे गिफ्ट देण्यावरून झालं भांडण! सासू वाद मिटवायला गेली अन् कात्रीनेच पत्नी आणि सासूला...

गेल्या वर्षी नेस्लेच्या शेअर्सची किंमत जवळजवळ एक चतुर्थांशने घसरली, ज्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये चिंता निर्माण झाली. खरं तर, जर्मनीतील पेन्शन फंड या कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. नेस्ले ब्रँडमध्ये पुरीना डॉग फूड, मॅगी बुउलॉन क्यूब्स, गेरबर बेबी फूड आणि नेस्क्विक चॉकलेट-फ्लेवर्ड ड्रिंकचा समावेश आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp