प्रेग्नंट GF ची केली हत्या..पती निघाला सीरिएल KILLER! 'त्या' 4 जणांचाही केला होता खून..सर्वात भयंकर घटनेमुळं महाराष्ट्र हादरला
Shocking love Affair News : रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भक्ती मायेकर हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरंवून सोडलं आहे.

बातम्या हायलाइट

आरोपी दुर्वासचं भक्ती मायेरकशी होते अनैतिक संबंध

याआधीही केले होते 4 खून

त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना
Shocking love Affair News : रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भक्ती मायेकर हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरंवून सोडलं आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी दुर्वास पाटीलने त्याच्या गर्भवती प्रेयसीची हत्या केली होती. आता पोलीस तपासात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दुर्वास पाटीलने भक्तीच्या हत्येशिवाय आणखी दोन हत्या केल्या होत्या.
पोलिसांच्या कसून तपासानंतर समोर आलं होतं की, दुर्वास पाटीलने 50 वर्षीय सीताराम वीरची हत्या केली होती. तो एका बारमध्ये काम करत होता. तो बार दुर्वासच्या वडिलांच्या नावावर होता. याशिवाय खंडाळामध्ये 28 वर्षीय राकेश जंगमची हत्या दुर्वासने केली होती. तपासादरम्यान, पोलिसांना वाटाड खंडाळा येथए राकेश बेपत्ता झाल्याचं समजलं होतं. त्यानंतर दुर्वासवर आणखी संशय बळावला. दरम्यान, पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर आरोपी दुर्वासने त्याचा गुन्हा कबूल केला.
आरोपी दुर्वासचं भक्ती मायेरकशी होते अनैतिक संबंध
दुर्वास पाटीलचं भक्ती मायेकरशी अनैतिक संबंध होते. पण जेव्हा भक्ती त्याच्या प्लॅनमध्ये अडथळा ठरली, तेव्हा त्याने तिचा खून केला. दोन मित्रांच्या मदतीनं भक्तीच्या मृतदेहाला त्याने घाटातील झाडीत फेकलं. चौदा दिवसानंतर भक्तीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी दुर्वासची कसून चौकशी केल्यानंतर त्याने कबूल केलं की, त्याने भक्तीसोबत मिळून चार हत्या केल्या होत्या. पोलिसांनी आरोपी दुर्वासला अटक केल्यानंतर अन्य संशयितांचाही तपास सुरु आहे.
हे ही वाचा >> मराठा आरक्षण: सरकारने नवा GR केला जारी, नेमकं काय आहे नव्या जीआरमध्ये?
त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना
ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. एका महिलेचं छाटलेलं मुंडक आढळल्याने परिसरात अनेकांना धक्का बसला होता. स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास एका व्यक्तीनं भिवंडी परिसरात ईदगाह रोडवर नाल्यात महिलेचं मुडकं छाटलेला मृतदेह पाहिला. महिलेचं वय 25 ते 30 असल्याचं समोर आलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर महिलेचं छाटलेलं मुंडकं ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर ते रुग्णालयात पाठवण्यात आलं. दरम्यान, याप्रकरणी आयपीसीच्या कलम 103 (1)हत्या आणि 238 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.