गर्भवती पत्नीला मारलं होतं..कोरानामुळे मृत्यू झाल्याचं खोटं सांगितलं! पोलिसांनी 4 वर्षानंतर कब्रस्थानमधून मृतदेह बाहेर काढला अन्..

मुंबई तक

Today Shocking Viral News :  मुजफ्फरनगरच्या एका धक्कादायक प्रकरणात न्यायालयाने 30 वर्षीय कपडा व्यापाऱ्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

ADVERTISEMENT

crime news 
Shocking Murder Case
Google CTA

बातम्या हायलाइट

point

लग्नानंतर हुंड्याची मागणी केली होती

point

पोस्टमार्टमनंतर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

point

न्यायालयाने पतीला सुनावली 10 वर्षांची शिक्षा

Today Shocking Viral News :  मुजफ्फरनगरच्या एका धक्कादायक प्रकरणात न्यायालयाने 30 वर्षीय कपडा व्यापाऱ्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने त्याच्या 7 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची 2020 मध्ये हत्या केली होती. त्यानंतर त्याने या हत्येबाबत खोटा दावा केला होता की, त्याच्या पत्नीची हत्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 2020 मध्ये घडली होती. त्यावेळी कोरोनाने संपूर्ण जगभरात हाहा:कार माजवला होता. त्याच दरम्यान, आरोपी ए.एस मोहम्मदने त्याची 25 वर्षीय पत्नी तबस्सुमची हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या कुटुंबियांना खोटी माहिती दिली. आरोपीने सांगितलं की, कोरोनामुळे त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे तबस्सुमला पोस्टमॉर्टमशिवाय दफन करण्यात आलं.

तबस्सुमचे मामा मुर्तजा अहमदला तिच्या मृत्यूबाबत संशय आला. त्यांनी म्हटलं की, जेव्हा तो त्याच्या भाचीच्या सासरी शिकारपूर गावात गेला होता. तेव्हा भाचीचा मृत्यू झाल्याचं कळलं. तिच्या शरीरावर जखम झाली होती. पण सासरच्या लोकांनी सांगितलं की, तिचा मृत्यू कोरानामुळे झाला, त्यामुळे घाईघाईत तिला दफन केलं गेलं. तीन दिवसानंतर मुर्तजा अहमद यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी आरोप केला की, तबस्सुमची हत्या हुंड्याच्या छळामुळे करण्यात आली होती. 

हे ही वाचा >> Maratha Reservation: सरकारने हैदराबाद गॅझेटिअरचा GR काढला, पण त्याचा खरा अर्थ काय?

लग्न आणि हुंड्याची मागणी

तक्रारीत म्हटलंय की, तबस्सुमचं लग्न मोहम्मदसोबत जवळपास 5 वर्षांपूर्वी झालं होतं. लग्नाच्या वेळी हुंडाही देण्यात आला होता. पण तरीही तिचा पती आणि कुटुंबातील लोक अतिरिक्त 2 लाख रुपयांची मागणी करत होते. यामुळे तबस्सुमचा छळ केला जायचा.