शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीला रस्त्यात अडवलं! नराधमांनी शेतात नेऊन गँगरेप केला अन् गुंगीचं औषध दिलं, पण 5 दिवसानंतर...
School Girl Rape Case : उत्तरप्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील एका गावात धक्कदायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथे आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना घडली.

बातम्या हायलाइट

नराधमांनी विद्यार्थीनीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं आणि..

पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

त्या ठिकाणीही घडली होती बलात्काराची घटना
School Girl Rape Case : उत्तरप्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील एका गावात धक्कदायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथे आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना घडली. 22 ऑगस्टच्या सकाळी दोन तरुणांनी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीला रस्त्यात अडवलं आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. शाळकरी मुलीला गुंगीचं औषध देऊन नराधमांनी तिचं लैंगिक शोषण केलं. पाच दिवसानंतर पीडित मुलगी शुद्धीवर आल्यावर तिने रडत रडत या संतापजनक घटनेबाबत कुटुंबियांना सांगितलं. त्यानंतर कुटुंबियांनी मंगळवारी तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
नराधमांनी विद्यार्थीनीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं आणि..
पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलंय की, रसूलपुर गावातील विकास नावाचा एक तरुण आणि त्याच्या साथीदाराने मुलीला रस्त्यात अडवलं आणि तिला शेतात नेलं. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आणि गुंगीचं औषध देऊन तिला बेशुद्ध केलं. पीडित मुलगी शुद्धीवर आल्यावर तिच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि आरोपींच्या विरोधात कारवाईची मागणी केली.
हे ही वाचा >> दोन्ही भावांनी टॉवेलनं महिलेचा गळा आवळला, नंतर पतीच्या डोळ्यादेखतच पत्नीची अब्रु लुटली, नेमकं काय घडलं?
पीडितेच्या काकाला धमकावल्या प्रकरणी गावातील रिंकू नावाच्या तरुणाचं नाव समोर आलं आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना विकास, त्याचा साथीदार आणि रिंकू फौजी विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे. रामपूरचे एसपी विद्या सागर मिश्र यांनी म्हटलंय की, शाहबाद कोतवाली परिसरात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीसोबत गँगरेप करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे. पीडित मुलीचं मेडिकलही करण्यात आलं आहे. तपासानुसार कारवाई केली जाईल.
त्या ठिकाणीही घडली होती बलात्काराची घटना
झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यात 50 वर्षीय महिलेचा सडलेला मृतदेह आढळला होता. महिलेवर बलात्कार करून तिचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मृत महिलेच्या मुलाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी या घटनेबाबत म्हटलं होतं, एका व्यक्तीने महिलेचा बलात्कार करून तिची हत्या केली.