पाकिस्तान पुन्हा हादरला! लाहोरला तीन मोठे स्फोट, सायरन वाजला, लोक पळत सुटले, घटना काय?

मुंबई तक

पाकिस्तानच्या स्थानिक वृत्तांनुसार, गुरुवारी सकाळी लाहोरमधील वॉल्टन रोडवर मोठे स्फोट ऐकू आले. वॉल्टर विमानतळाजवळील लाहोरमधील गोपाल नगर आणि नसीराबाद भागात एकामागून एक अनेक स्फोट झाले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाहोरमध्ये मोठे स्फोट. पाकिस्तान पुन्हा हादरला

point

सायरन वाजल्यानंतर घराबाहेर पळत सुटले लोक

Pakistan Lahore Blast : भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानच्या तंबूत चांगलीच घबरटाट पसरली आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे हादरलेल्या पाकिस्तानमध्ये आज पुन्हा एकदा हादरवून टाकणारी घटना घडली. लाहोरमध्ये अनेक स्फोट झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

हे ही वाचा >> पाकिस्तानी सैन्याची गाडी रिमोट बॉम्बने उडवली, 7 जणांच्या चिंधड्या उडाल्या... BLA ने केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ

तीन मोठे आवाज आल्यानंतर लोकांमध्ये घबराट 

पाकिस्तानच्या समा टीव्हीच्या वृत्तानुसार, गुरुवारी सकाळी लाहोरमधील वॉल्टन रोडवर मोठे स्फोट ऐकू आले. वॉल्टर विमानतळाजवळील लाहोरमधील गोपाल नगर आणि नसीराबाद भागात एकामागून एक अनेक स्फोट झाले. त्यानंतर परिसरात सायरन वाजायला सुरूवात झाल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले. यामुळे आजूबाजूच्या परिसरात धुरांचे लोट उठताना दिसले.हे ही वाचा  

वॉल्टन विमानतळाजवळ हा ड्रोनचा स्फोट झाल्याची माहिती आहे. हा स्फोट ड्रोनने झाला असावा अशी माहिती आहे. जॅमिंग सिस्टममुळे ड्रोन पाडण्यात आल्याचं वृत्त आहे. स्थानिकांचं म्हणणं आहे की लाहोरमधील अक्सारी 5 रोडजवळही दोन मोठे स्फोट ऐकू आले. त्यानंतर नेव्हल कॉलेजमधून धूर निघताना दिसत होता.

हे ही वाचा >>'सीमा हैदरला पाकिस्तानमध्ये हाकलून द्या..', असं म्हणालेले लोक, त्याच सीमाने 'ऑपरेशन सिंदूर'वर..'

दहशतवादाचं कंबरडं मोडण्यासाठी भारतीय सैन्याने कारवाई केली. मंगळवारी रात्री उशिरा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले केले होते. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या संयुक्त ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील ज्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करण्यात आले ते बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद आहेत. बहावलपूरमधील बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय आणि मुदिरके येथील लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय लक्ष्यित करण्यात आले. या हल्ल्यातून पाकिस्तान अजून सावरलेलाही नाही, तेव्हाच हे स्फोट झालेत.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp