Maratha Reservation GR: सरकारचा मोठा निर्णय.. पहिला GR आला समोर, वाचा नेमकं काय आहे त्यात! GR जसाच्या तसा
Maratha Reservation Hydrabad Gazzette GR: मराठा आरक्षणाबाबत हैद्राबाद गॅझेटिअर लागू करण्याचा जीआर राज्य सरकारने जारी केला आहे. पाहा या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय.
ADVERTISEMENT

मुंबई: मराठा आरक्षणासाठीत मुंबईत आंदोलन सुरू असताना मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगेंशी चर्चा केली. यावेळी उपसमितीने जो मसुदा तयार केला होता त्याबाबत जरांगेंना माहिती देऊन त्यांची संमती यावेळी घेण्यात आली. यावेळी जो मसुदा तयार करण्यात आला त्यात सहा मागण्या होत्या. याच सहा मागण्यांचे तीन वेगवेगळे जीआर काढण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. त्यानुसार आता पहिला जीआर समोर आला आहे.
पहिला जीआर हा हैद्राबाद गॅझेटिअरच्या संबंधित काढण्यात आला आहे. पाहा त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय.
हैद्राबाद गॅझेटिअर लागू करण्याबाबतचा GR जसाच्या तसा...
हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी किंवा कुणबी- मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपध्दती विहित करण्याबाबत
महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन
निर्णय क्र.:- - सीबीसी-२०२५/प्र.क्र. १२९/मावक
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय (विस्तार), मुंबई-३२.
दि. ०२ सप्टेंबर, २०२५