8th May Gold Rate : ऑपरेशन सिंदूरनंतर सोन्याचे भाव भिडले गगनाला! तुमच्या शहरात काय आहेत सोन्याचे दर? जाणून घ्या
Gold Rate Today : भारतात सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सण उत्सव आणि लग्नसराईच्या हंगामात तुम्ही सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर सोन्याच्या रोजच्या दराबाबत अपडेट राहणं महत्त्वाचं असतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today : भारतात सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सण उत्सव आणि लग्नसराईच्या हंगामात तुम्ही सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर सोन्याच्या रोजच्या दराबाबत अपडेट राहणं महत्त्वाचं असतं. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीत बदल होत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात होणारी उलथापालथ, डॉलरची किंमत, मागणी आणि सप्लाय या गोष्टी याला कारणीभूत असतात. दरम्यान, भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्याचं समोर आलंय.
भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 9901 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 9076 रुपये झाले आहेत. तसच 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे भाव 7426 रुपयांवर पोहोचले आहेत. तर भारतात आज चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम 99100 रुपयांवर पोहोचली आहे. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय?
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 99600 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91300 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 99600 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91300 रुपये झाले आहेत.










